👁 10 Views

नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरण्यास उमेदवारांना प्रोत्साहित करावे – तहसिलदार मधुसूदन बर्गे

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 20 september  2017 

पंढरपूर दि. 20 :- राज्यात होणा-या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे धोरण राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केले आहे. तालुक्यातील 11  ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी केले.
येथील सांस्कृतीक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरण्याबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात  ते बोलत होते.यावेळी  नायब तहसिलदार एस.पी तिटकारे,  निवडणूक  शाखेचे आर.व्ही.सावळे, जी.एस.सगेल ,आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात तहसिलदार बर्गे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरताना सोबत आवश्यक कागदपत्रांची माहिती, तसेच उमेदवारांची पात्रता आदी बाबत तपशिलवार माहिती दिली. यावेळी संभाव्य निवडणूक लढविणारे उमेदवार, नागरीक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते  अधिकारी , कर्मचारी यांना या प्रशिक्षण कार्यक्रमात माहिती दिली.
तालुक्यातील  11 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये  नेमतवाडी, मेंढापूर, बार्डी, आजोती, व्होळे, खरातवाडी,पुळजवाडी, खेड भोसे, सुगांव खुर्द, टाकळी- गुरसाळे (पुन:)  आणि तुगंत या ग्रामपंचायतीचा समावेश असून, दिनांक  22 ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत( शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 11 ते दुपारी 4.30 वाजेंपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केली जाणार आहेत. अर्जाची छाननी दिनांक 3 ऑक्टोबर 2017  रोजी सकाळी 11.00 वाजले पासून  करण्यात येणार आहे.  तसेच दिनांक 5 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत आपले नामनिर्देश पत्र  माघारी घेण्याची मुदत असून, दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार  असल्याची माहिती तहसिलदार बर्गे यांनी दिली.
आदर्श आचारसंहितेचे पालन करुन कायदा व सुव्यस्थेचा भंग होणार नाही यांची  दक्षता सर्वांनी घ्यावी. तसेच उमेदवारांनी निवडणुक प्रचारात खर्चाच्या मर्यादा ओलांडू नये अशा सुचनाही  तहसिलदार बर्गे यांनी दिल्या.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *