पंढरपूर लाईव्ह व सा. झंझावात च्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना दसरा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
सर्व बौध्द बंधु भगिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
सर्व बौध्द बंधु भगिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 30 september 2017
पंढरपूर: प्रतिनिधी
यापुर्वी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, कालव्यासाठी मातीमोल दराने वाखरीच्या जमीनीचे भुसंपादन झालेले आहे. आता पुन्हा एक दिवसाच्या पालखी सोहळ्यासाठी वाखरीत विकास प्राधीकरणाचे कोणतेही काम केले जाऊ नये. हा अन्यायकारक आराखडा मान्य नाही त्यामुळे त्याची अंमलबजावणी केली जाऊ नये अशी मागणी करीत वाखरी ग्रामस्थांनी पंढरपूर विकास आराखडा विशेष ग्रामसभेत फेटाळला आहे. त्याचबरोबर शासनाकडून जर आराखडा लादला जाणार असेल तर पालखी सोहळ्यावर बहिष्कार टाकू आणि तीव्र आंदोलन उभा करू असाही इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
पंढरपूर विकास आराखड्यावरून वाखरी गावामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून खळबळ उडाली आहे. प्राधीकरणाच्या आराखड्यातून रिंगरोड, पालखी तळ विस्तारिकरण, स्टेडियम, भजन, किर्तन मंडप अशा प्रकारचे विविध आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या आराखड्यावर हरकतीही मागवल्या आहेत. या आराखड्यातील विकास कामासाठी शेकडो हेक्टर सुपीक जमीन संपादीत केली जाणार आहे.
यामुळे शेकडो शेतकरी भुमीहिन, अल्पभूधारक आणि बाधीत होणार आहेत. अनेकांची घरेसुद्धा या आराखड्यामुळे बाधीत होणार आहेत. आराखड्याचे नेमके चित्र अद्याप पुर्णपणे स्पष्ट झाले नसल्यामुळे वाखरी ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता पसरली आहे. या आराखड्यास तीव्र स्वरूपाचा विरोध सुरू झाला आहे.
या आराखड्यास मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी हरकती दाखल केलेल्या आहेतच शिवाय गावातील सर्वच शेतकर्यांच्यावतीने विशेष ग्रामसभा घेऊन या आराखड्यास विरोध दर्शवण्यात आला आहे. यासंदर्भात गुरूवारी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतीच्या अभ्यासिकेत विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. सरपंच सौ. मथुराबाई मदने या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मस्के यांनी प्राधीकरणाचा विकास आराखडा पुर्णपणे फेटाळण्याची सुचना केली असता ग्रामस्थांनी हात वर करून संपुर्ण आराखड्यास विरोध असल्याचा ठराव संमत केला.
त्याचबरोबर आराखड्याचे नकाशे व प्रस्तावित विकास कामे यासंदर्भात नेमकी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सर्व नकाशे ग्रामपंचायतीमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, हरकती दाखल करण्यासाठी 20 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशीही मागणी यावेळी ठरावाद्वारे करण्यात आली.
यावेळी बोलताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गंगाधर गायकवाड यांनी प्राधीकरणाचा हा आराखडा अन्यायकारक आहे. यापुर्वी उजनीच्या कालव्यासाठी, कण्हेर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीनी संपादीत केल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा जमीनी संपादन करू नयेत. रिंगरोडसाठी पर्यायी रस्त्याचा विचार करावा अशी मागणी केली.
माजी पंचायत समिती सदस्य निखीलगीर गोसावी यांनी प्राधीकरणाचा विकास आराखडा पुर्णपणे चुकीचा असून अनावश्यक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही सर्व गामे रद्द करावीत आणि ग्रामस्थांच्या माहितीसाठी आराखडा नकाशे गावात द्यावेत तसेच हरकतीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. सहकार शिरोमणीचे माजी संचालक शिवाजी मदने यांनी वाखरीच्या शेतकर्यांनी कायम वारकर्यांची सेवा केली आहे. कधीही वाखरीत वारकर्यांची, दिंड्या व पालख्यांची गैरसोय झालेली नाही. असे असताना त्यांच्या नावाखाली शेतकर्यांना देशोधडीला लावणार आराखडा लादला जात असेल तर तीव्र आंदोलन उभा करू असा इशारा दिला.
ग्रा.पं.सदस्य चंद्रकांत मस्के यांनी पालखी तळाशिवाय सुपीक जमीन घेणार असाल तर आम्ही वाखरीकर पालखी सोहळ्यावर बहिष्कार घालू असाही इशारा दिला. यावेळी उपसरपंच सौ. कोमल सुरवसे यांच्यासह सर्व ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


