👁 7 Views

महाराष्ट्र शासनाच्या आजच्या महत्वाच्या बातम्या..! संविधान दिनानिमित्त संविधान दौड आणि संविधान साहित्य परिषद – सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017

संविधान दिनानिमित्त संविधान दौड आणि संविधान साहित्य परिषद
– सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
            मुंबईदि. 8 : संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी संविधान दिनानिमित्त वरळी सी-फेस ते चैत्यभूमीदादर पर्यंत संविधान दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. तर 3 डिसेंबर, 2017रोजी संविधान साहित्य परिषदेचे आयोजन करण्याचे करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन सामाजिक न्याय विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी करावेअसे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले.
            संविधान दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीस श्री.बडोले बोलत होते. या बैठकीस आमदार भाई गिरकरअनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी. एस. थुलसामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारेबार्टीचे महासंचालक राजेश धाबरेपोलीस विभागाचेमुंबई महापालिकेचे,आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच समता प्रतिष्ठानचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            श्री. बडोले पुढे म्हणालेसंविधानविषयी जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने संविधान दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संविधान दिनानिमित्त संविधान दौड’ आयोजित करण्यात आली असून या दौडमध्ये मॅरॉथॉनमध्ये धावणारे धावपटूक्रीडा क्षेत्रातील व्यक्तीमहाविद्यालयातील एन.सी.सी.एन.एस.एस. चे विद्यार्थीतसेच शालेय विद्यार्थीस्थानिक परिसरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधीसामाजिक न्याय विभागा अंतर्गत कार्यरत असणारे विविध महामंडळाचे अधिकारी/कर्मचारी यांना आमंत्रित करावे. या दौडमध्ये विविध गट धावणार असल्याने प्रत्येक गटानुसार संविधान दौडची विभागणी करावी. वाहतुकीचे योग्य नियंत्रण व समन्वय वाहतूक शाखेने करावे. संविधान दौडला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याचे अपेक्षित असल्याने तज्ज्ञ डॉक्टर व औषधांच्या साठ्यांसह रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात. या संविधान दौडच्या कार्यक्रमाचे समन्वय समता प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            या दौडमध्ये सहभाग घेणाऱ्यांची नोंदणी करावी. त्यांना नोंदणी क्रमांक द्यावाअशा विविध सूचना आमदार भाई गिरकर तसेच अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी. एस. थुल यांनी केल्या.
            वरळी सी-फेस येथे संविधान उद्देशिकेचे वाचन करुन संविधान दौडची सुरुवात होऊन संविधान दौडचैत्यभूमी येथे समाप्त होईल. दौड मधील विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच दौडमधील सहभागी झालेल्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईलअसे बार्टीचे महासंचालक राजेश धाबरे यांनी सांगितले.13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

संविधान साहित्य परिषद
            संविधान दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर, 2017 रोजी मुंबई येथे संविधान साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये संविधानाचा अभ्यास असलेले राज्य तसेच देशातील तज्ज्ञ व्यक्ती यांचे संविधानातील आर्थिकसामाजिकशैक्षणिक तरतुदीच्या अनुषंगाने व्याख्याने आयोजित करावी. तसेच याच विषयाच्या अनुषंगाने कवी संमेलनचर्चासत्रेसंविधानाचे वाचन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे,अशा सूचनाही सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांनी यावेळी केल्या.
००००
विष्णू काकडे/वि.सं.अ./8.11.17
वृ.वि. 7173                                                                               17 कार्तिक1939 (सायं. 5.20)
  दि.  8 नोव्हेंबर2017


पालघर बाल आरोग्याची यशस्वी वाटचाल‘ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबईदि. 8 : पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे या भागातील बालमृत्यू गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. त्याबाबत माहिती देणाऱ्यापालघर बाल आरोग्याची यशस्वी वाटचाल‘ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान करण्यात आले.
गेल्यावर्षी कुपोषणामुळे पालघर जिल्ह्यात बालमृत्यूंची संख्या वाढली होती. त्यावर उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केली होती. वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यातील जव्हारमोखाडाविक्रमगडतलासरी भागातील दुर्गम पाड्यावर भेटी दिल्या. आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या. पुनरागमन शिबिरासारखा अभिनव उपक्रम राबविला. यासोबतच आदिवासी बांधवांची मानसिकता बदलण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांनी दौऱ्यात समजावून सांगितल्या. या सर्व उपाय योजनांबाबत आरोग्यमंत्र्यांनी या पुस्तिकेत माहिती दिली आहे.
आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सचित्र माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.
काल मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलमहिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेउद्योगमंत्री सुभाष देसाईगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहताआरोग्यमंत्री डॉ. सावंतमुख्य सचिव सुमित मल्लिकआरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.
००००
अजय जाधव..८.११.१७
वृ.वि. 7170                                                                               17 कार्तिक1939 (दु. 4.40)
  दि.  8 नोव्हेंबर2017
सहकारी सूत गिरण्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी समिती गठीत करणार
– सुभाष देशमुख

मुंबईदि. 8 : राज्यातील अनेक सहकारी सूत गिरण्या अडचणीत आहेत. सर्व सूत गिरण्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठीत्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी लवकरच एक समिती नेमण्यात येईलअसे सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सांगितले.
          राज्यातील सर्व सूत गिरण्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ आणि सहकारी सूत गिरण्यांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
          श्री. देशमुख म्हणालेसहकार क्षेत्रात चांगले काम करणा-यांना शासनाचे नेहमी सहकार्य आहे. सूत गिरण्यांना उर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून कापसाच्या गाठी सूत गिरण्यांच्या गोदामामध्ये ठेवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. सहकारी सूत गिरण्या अडचणीत का आल्याखासगी,आंतरराष्ट्रीय पातळीच्या सूत कंपन्यांशी स्पर्धा करताना येणा-या समस्या आणि राज्यातील सूत गिरण्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
          वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामीअण्णासाहेब डांगेप्रा. के. डी. कुराडेसविता गायकवाडकिशोरी आवाडे आदिंसह सूत गिरण्यांचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

००००
 वृ.वि. 7171                                                                               17 कार्तिक1939 (दु. 4.40)
  दि.  8 नोव्हेंबर2017
तूरडाळ मागणी व दर बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावा
– सुभाष देशमुख
मुंबईदि. 8 : राज्यात शासनाने मोठ्या प्रमाणावर  हमी भावाने तूर  खरेदी केली आहे. शासनाच्या विविध विभागांना आवश्यक असलेली तूरडाळ मागणी आणि प्राप्त खरेदी दर याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर ठेवावाअसे निर्देश  पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले.
          तूर भरडई व पुरवठा याबाबतची आढावा बैठक पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. आदिवासी विकास विभागमहिला व बालकल्याण विभागगृह विभागअन्न व नागरी पुरवठा विभाग यांची तूरडाळीची मोठी मागणी आहे. या विभागांकडून खरेदी केल्या जाणा-या दराचा आणि मागणीचा प्रस्ताव संबंधित विभागांनी तात्काळ तयार करावा आणि ज्या विभागाची मागणी आहे त्या विभागाचे एकत्रित प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावेतअसेही त्यांनी सांगितले.
          राज्यातील स्थानिक गोदाम आणि मिलर मधून जिल्ह्याच्याच ठिकाणी तूरडाळ उपलब्ध करून देण्यात यावी. त्याठिकाणी पुरवठा करण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी. तसेच मार्केटिंग फेडरेशनने सप्लाय कॉन्ट्रक्टरला सांगून उपलब्ध तूरडाळ पुरवठा करण्यास सांगावे,अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या.
सर्वसामान्यांना कमी दरात चांगल्या दर्जाची तूरडाळ मिळावी यासाठी सुध्दा शासनाकडून राज्यातील सर्व रेशन दुकानांवर प्रती महिनाप्रती शिधापत्रिका धारकाला 1 किलो तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावावर चर्चा करून 1 किलो पॅकींगमध्ये तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
या बैठकीला मार्केटिंग फेडरेशनअन्न व नागरी पुरवठा विभागआदिवासी विकास विभागगृह विभाग,महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

००००
वृ.वि. 7166                                                                                17 कार्तिक1939 (दु. 3.00)
  दि.  8 नोव्हेंबर2017
डब्ल्यूटीएम लंडन २०१७ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने
केले पर्यटकांना आकर्षित

मुंबई, दि. 8 : लंडनमधील डब्ल्यूटीएम 2017मध्ये सहभागी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने परदेशी पर्यटकांना आकर्षित केले.
लंडन येथे ६ ते  नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट २०१७या कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सहभाग घेतला. महाराष्ट्राचे वैविध्य जागतिक पातळीवर दाखविणे हा या कार्यक्रमात सहभागी होण्याचा उद्देश होता. डब्ल्यूटीएम लंडन २०१७ येथील महाराष्ट्र पॅव्हेलिअनचे उद्घाटन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. या वेळी भारताच्या पर्यटन सचिव श्रीमती रश्मी वर्माएमटीडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड उपस्थित होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) या वर्षी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन वन्य पर्यटनवारसा पर्यटनकिल्ले पर्यटनहेलि पर्यटनवैद्यकीय पर्यटनशहर सहलीवाईन पर्यटनखाण पर्य़टन,क्रुझ पर्यटन आणि वेलनेस पर्यटनाचा प्रसार केला. महाराष्ट्र हे आराम करण्यासाठी आणि व्यावसायिक दृष्टीने पर्यटन उद्योगासाठी रोमांचक आणि उत्पादनक्षम राज्य म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने आयसीई आणि इतर हॉस्पिटॅलिटी महाविद्यालयांशी हातमिळवणी करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित केली जातात आणि त्यांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या एमटीडीसी रिसॉर्ट्समध्ये इंटर्नशिप करण्याची उपलब्ध करून देण्यात येते.
पर्यटन उद्योगासाठी डब्ल्यूटीएम लंडन हा एक अग्रणी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असतो. पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी काम करणारे विविध घटक सहभागी या कार्यक्रमात होतात. या तीन दिवसांत विविध पर्यटन विभाग एका छताखाली एकत्र येतात आणि आपापली पर्यटन स्थळेकौशल्ये आणि खासगी उद्योगांचे प्रदर्शन मांडतात आणि जगभरात पर्यटनाच्या संधी विस्तारीत करण्यासाठी ५१,००० पर्यटन तज्ज्ञआयात उद्योगातील खरेदीदारडिजिटल प्रभाव पाडणारे घटक आणि पर्यटन मंत्री यांच्याशी जोडले जाण्याची संधी मिळते.
या वेळी प्रतिक्रिया देताना पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, “एकाच छताखील सर्व जग पाहणेया उद्योगक्षेत्रातील अग्रणी उद्योजकांकडून आणि पर्यटन क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या संकल्पना पाहून प्रेरणा घेणे हे अत्यंत प्रोत्साहित करणारे आहे. आपला उद्योग वाढविण्यासाठी आणि या क्षेत्राशी संबंधित जगातील सर्व संबंधित घटकांना एका छताखाली भेटता येण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. महाराष्ट्र हे अत्यंत समृद्ध पर्यटन स्थळ आहे जे जगभरातील पर्यटकांच्या गरजा भागवते. महाराष्ट्रातील पर्यटन भांडारचैतन्यमय संस्कृतीवैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे आणि गुंतवणुकीच्या संधी यांचे आक्रमक मार्केटिंग करण्यासाठी डब्ल्यूटीएम लंडन २०१७ मध्ये सहभागी होणे ही सुवर्णसंधी होती.”
एमटीडीसीबद्दल:
पर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळेतेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशेमहाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे स्वच्छ सागरकिनारेअभयारण्ये,थंड हवेची ठिकाणेनैसर्गिक गुंफाधबधबेभव्य किल्लेविविधरंगी महोत्सवप्राचीन तीर्थस्थळे,वस्तुसंग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी भेट द्या: http://www.maharashtratourism.gov.in/
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

००००
वृ.वि. 7167                                                                               17 कार्तिक1939 (दु. 3.05)
  दि.  8 नोव्हेंबर2017
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
जलयुक्त शिवार अभियानासाठी
बोधचिन्ह रेखाटन स्पर्धा
  मुंबईदि. 8 : ग्रामीण महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानासाठी बोधचिन्ह (लोगो) रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या बोधचिन्हाचा वापर अभियानाचे अधिकृत बोधचिन्ह म्हणून करण्यात येईल.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियानाची राज्यात व्यापक पातळीवर अंमलबजावणी सुरू केली. विकेंद्रित पाणीसाठ्यांच्या निर्मितीतून  शाश्वत सिंचनासह जमिनीतील आर्द्रता संरक्षित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या अभियानामुळे आतापर्यंत साडेअकरा हजार गावांमध्ये जलसंधारणाची चार लाखाहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. अभियानाच्या कामांमधून जवळपास १६ लाख टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून त्यातून २१ लाख हेक्टरहून अधिक सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. या अभियानास शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून लोकसहभागातून झालेल्या कामांची किंमत ५७० कोटींपेक्षा अधिक आहे. अभियानाच्या कामांचे नियोजनअंमलबजावणी आणि सनियंत्रणातही नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे. लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झालेल्या या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भूजल पातळीपाणी साठवण क्षमताफलोत्पादन क्षेत्रपिकांची उत्पादन क्षमता,चारा उत्पादन आणि जमिनीची आर्द्रता यामध्ये वाढ झाली आहे.
या स्पर्धेतील सहभागासाठी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी पाचपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्याला १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून स्पर्धेच्या अटीशर्ती आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

—–000—–

वृ.वि. 7168                                                                                17 कार्तिक1939 (दु. 3.40)
  दि.  8 नोव्हेंबर2017
टाटा कन्सल्टन्सीच्या अद्ययावत कॅम्पसचे ठाण्यात उद्घाटन
महाराष्ट्रात स्टार्ट अप्ससाठी अधिक पोषक वातावरण तयार करणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे दि ८: स्टार्टअप्स कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून टाटा सारख्या नामांकित आणि विश्वासार्ह कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात स्टार्ट अप्ससाठी पोषक वातावरण तयार करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अशा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या भारतातील सर्वात मोठ्या अशा टीसीएस ऑलम्पस सेंटर या भव्य कॅम्पसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हिरानंदानी इस्टेट येथे पार पाडले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
१९ लाख स्क्वेअर फुट जागेत विस्तारलेल्या या कार्यालयासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गेल्या वर्षी हिरानंदानी यांच्याशी करार केला होता. याठिकाणी एकाचवेळी ३० हजार कर्मचारी काम करू शकतील अशी व्यवस्था आहे. टीसीएस आणि हिरानंदानी यांच्यात या जागेसाठी १५ वर्षांचा करार करण्यात आला आहे.
डिजिटल रिस्पॉन्सीबल इकॉनॉमीकडे वाटचाल
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले किआज देशात निश्चलिकरण झाले त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे.  एकीकडे टाटा कन्सल्टन्सी ही डिजिटल क्रांतीमध्ये आपले बहुमुल्य योगदान देत आहे तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणत आहे त्याचवेळी डिजिटल रिस्पॉन्सीबल इकॉनॉमीकडे आपली वाटचाल सुरु होत आहे हा निश्चितच एक चांगला योगायोग आहे. टीसीएस आणि टाटा या डिजिटल युगात काय उपक्रम करीत आहेत आणि देशाला त्याचा काय फायदा होतं हे टीकाकारांनी प्रत्यक्ष पाहून समजावून घ्यावे. ठाणे येथील या देशातील अद्ययावत अशा कॅम्पस मुळे ३० हजार जणांना रोजगार मिळणार आहे त्याचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले कियानंतर नागपूर येथील कंपनीच्या प्रकल्पातही १०हजार तंत्रज्ञाना रोजगार मिळणार आहे तसेच पुणे येथील प्रकल्पामुळे तर महाराष्ट्राची मान डिजिटल क्षेत्रात अधिक उंचावेल.
पुणे ही देशातील स्टार्टअप्सची राजधानी होणार
देशातील ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षाखालील असून ही तरुण पिढी तंत्रज्ञानात प्रगत आहे तसेच त्यांना नवीन उपक्रम सुरु करण्याची उर्मी आहे. त्यांना आता नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बनायचे आहे त्यामुळे पुढील काळात स्टार्ट अप्सना उत्तेजन दिले जाईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुणे ही देशातील स्टार्ट अप्स ची राजधानी होईल असा विश्वास व्यक्त केला. लवकरच राज्याचे फिनटेक धोरण ठरविण्यात टाटा सन्ससारख्या सक्षम कंपन्यांची मदत घेतली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. टाटा समूह नाशिक येथे सामाजिक जबाबदारीतून करीत असलेल्या उपक्रमांचीही मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली.
आपण केवळ चीनमध्ये अतिशय कमी कालावधीत मोठे मोठे प्रकल्प बांधून पूर्ण झाले असे पाहतो पण हा टीसीएसचा अवाढव्य प्रकल्प केवळ १८ महिन्यात उभारला त्याचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
ईझ ऑफ डुईंग बिजिनेस मध्ये महाराष्ट्र पुढे- टाटा सन्सचे चेअरमन
याप्रसंगी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रसेकरन यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र हा ईझ ऑफ डुईंग बिजिनेस मध्ये अव्वल क्रमांकावर आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योग विभाग व शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले. ते म्हणाले कि १५० वर्षांपासून टाटा समूह हा विविध माध्यमातून आणि क्षेत्रात या देशात कार्यरत आहे मात्र आमचे मूळ हे महाराष्ट्र आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी देखील मनोगत व्यक्त केले . ते म्हणाले कि मुंबई हे संपूर्ण देशात आजही गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे स्थळ असून शासन आम्हाला खूप सहकार्य करीत आहे.
प्रारंभी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नामफलकाचे अनावरण तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजन विचारेकपिल पाटीलआमदार संजय केळकरप्रताप सरनाईकगणपत गायकवाड,महापौर मीनाक्षी शिंदेजिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकरमनपा आयुक्त संजीव जयस्वालपोलीस आयुक्त परम बीर सिंहनिरंजन हिरानंदानी आदि मान्यवर उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

0000

वृ.वि. 7169                                                                                17 कार्तिक1939 (दु. 3.45)
  दि.  8 नोव्हेंबर2017
पालघरचे शासकीय मुख्यालय जनतेसाठी असेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालघर जिल्हा मुख्यालयाचे भूमिपूजन व कोनशिला संमारंभ संपन्न
            पालघर दि. ८ : राज्यात उत्तम नियोजन असलेली स्थानिक व आधुनिक स्थापत्यशैलीचा संगम व आकर्षक बांधकाम असलेली पालघर जिल्हा मुख्यालयाची इमारत  राज्यात सर्वात सुंदर वास्तू ठरणार आहे.  त्यासोबतच हे शासकीय कार्यालय जनतेसाठीच असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
            पालघर जिल्हा मुख्यालय भुमिपूजन व कोनशिला  अनावरण कार्यक्रमांप्रसंगी  श्री . फडणवीस बोलत होते. यावेळी आदिवासी विकास तथा पालकमंत्री  विष्णू सवरासार्वजिनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सांवतगृह(ग्रामीण)वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकरजिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे,कोकण
विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटीलउपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकसिडकोभूषण गगराणी,आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्माजिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेजिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकरपोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे आदि मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कीसिडकोच्या माध्यमातून यासाठी 600 कोटीची गुंतवणूक होणार आहे.  राज्यातले उत्तम नियोजन असलेली जिल्हा मुख्यालयाची वास्तू पालघरची ठरेल.  यासाठी निधीची कमतरता नाही.  सामान्य नागरिकाला हे कार्यालय आपले वाटले पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे याबाबत प्रशासनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  जिल्हा निर्मिती होऊन तीन वर्षे झालेली आहेत.  या जिल्ह्याकरिता अनेक योजना हाती घेतल्या आहेत.  त्या पुढील दोन वर्षात पूर्ण केल्या जातील.
            जिल्ह्यातील कुपोषण दूर करण्यासाठी विशेष टास्कफोर्सची निर्मिती केली आहे.  त्यामाध्यमातून कुपोषणात ४० टक्के घट झाली आहे.  सेवा व जागृती यातून आदिवासी विकास होत असतो.   जव्हार-मोखाडा याठिकाणी जवळपास ३००० मि.मि. पाऊस पडतो परंतु उन्हाळ्यात येथे पाणी टंचाई जाणवते.  यासाठी जलसंधारण विभाग व सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून याभागात विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.  तसेच याभागात पर्यटनालाही मोठा वाव आहे.  यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून येथील तरुणांना पर्यटणाच्या माध्यमातून मोठ्याप्रामणात रोजगार निर्मिती होणार आहे.  यातून स्थलांतर कमी होण्यास मदत होणार आहे.
            आदिवासी विभागाचे चांगले काम असून नामांकित शाळेतून राज्यातल्या २५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी व विज्ञान विषयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कराडीपथ आणि एकलव्य उपक्रम राबवीले जात आहे. 1 लाख 32 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  इंग्रजीमुळे जगाचे शिक्षण आदिवासी मुलांना मिळत आहे. केंद्रीय किचनमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार उपलब्ध झालेला आहे. त्यातून कुपोषण कमी होण्यास मदत झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकूल योजनांचा लाभ सर्व आदिवासींपर्यंत पोहचवा त्यातून सर्व आदिवासी बांधवांना स्वत:च्या हक्काची पक्की घरे मिळणारा पालघर हा पहिला जिल्हा ठरेल.  परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत देण्यात येइल असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
            यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा म्हणाले कीनवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाचे भूमिपूजन होताना मला विशेष आनंद होत आहे.  जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न सुरु आहेत.  यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन मिळत आहे.  जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले आहे.  जिल्ह्यात दळण-वळणाच्या चांगल्यासोयी निर्माण करीत आहोत. पेसा अंतर्गत जिल्ह्यातील ४११ ग्रामपंचायतींना याचा थेट लाभ मिळत आहे.  वनहक्काची योग्य अंमलबजावणी करीत आहोत.  जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्रयांच्या मार्गदर्शनाने  विशेष प्रयत्न करत असल्याचेही सवरा यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत म्हणाले कीटास्कफोर्सच्या माध्यमातून मला पालघर जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली.  येथील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न टास्कफोर्सच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.  त्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. मनोर येथे ट्रॉमा केअर सेंटर लवकरच सुरु करीत आहोत.  पालघर जिल्हा पर्यटनासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे.  पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.  येथील जंगलात मोठयाप्रमाणात अनेक वनऔषधीची वनस्पती उपलब्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात औषधी कंपन्या आल्यास येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करता येईल.  यामुळे आदिवासींचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासा मदत होईल.
            यावेळी आदिवासी विकास विभागाच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची चित्रफीत दखविण्यात आली.  आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी व विज्ञान विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी कराडी पथ व एकलव्य उपक्रमांचे उद्घाटन व करारनाम्यावर स्वाक्षऱ्याही झाल्या. जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरण पालघर पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

            यावेळी खासदार चिंतामण वनगाखासदार कपिल पाटीलआमदार पास्कल धनारेआनंद ठाकूररविंद्र फाटकअमित घोडाविलास तरे,


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *