👁 8 Views

पंढरपूर येथे रंगभुमी दिन साजरा

पंढरपूर येथे रंगभुमी दिन साजरा 



पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017
पंढरपूर : पंढरपूर येथे रंगभुमी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे नटराज पुजनाचे आयोजन करण्यात आले होते.

 या प्रसंगी जेष्ठ कलावंतांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पंढरपूर जरी अध्यात्म नगरी असली तरी विविध कलेच्या माध्यमातून नृत्य, गायन, नाट्य अभिनय, चित्रपट निर्माते , लघुपट निर्माते, एकांकीका , लोककला असे विविध कला जोपासणाºया कलावंतांनी या पावन नगरीला कला नगरीचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे.
सुमारे पन्नास वर्षाहून अधिक काळ शहर व परिसरात नाटकांचे प्रयोग, संगीत मेळे, स्थानिक कलावंत करीत×Y अनेक दर्जेदार नाटक इथल्या रसिकांना देण्याचा प्रयत्न कलावंतांनी केला आहे. पंढरीतील जेष्ठ कलावंतांनी आपल्या कला गुणांच्या माध्यमातून आपला कला अविष्कार दाखवून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यामुळे कानाकोपºयात पंढरीचे नाव अजरामर झाले आहे.
असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी कलावंत विनय बडवे , किसन कस्तुरे, गोविंद भातलवंडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे दिलीप कोरके, दत्ता जगताप,  बाल कलाकार रशीदा संत, खिस्ते, शिरगिरे, मुन्ना शेख, प्रमोद शेटे, छबु उत्पात, आप्पा हरवाळकर, कालिदास सोनवणे, अनिल वें गार, संतोष शिरगिरे, अजित व्यवहारे यांचेसह विविध कलेच्या माध्यमातून नृत्य, गायन, नाट्य अभिनय, चित्रपट निर्माते , लघुपट निर्माते, एकांकीका , लोककला असे विविध कला जोपासणारे कलावंत उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र शेवडे यांनी केल.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने दिलीप कोरके व दत्ता जगताप यांनी केले होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *