👁 9 Views

निवडणूक प्रक्रियेच्या माहितीसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

निवडणूक प्रक्रियेच्या माहितीसाठी

सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन



पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017

सोलापूर दि. 08 :- भविष्यात मतदान म्हणून नोंदणी होणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक आणि निवडणूक विषयक प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे (क्विझ) आयोजन केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विषयक शाखेकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती  नियुक्त करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी समितीचे सदस्य सचिव आहेत.
याबाबत निवडणूक शाखेतील तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी सांगितले की, ही स्पर्धा प्रथम तालुका स्तरावर घेतली जाईल. त्यानंतर जिल्हा स्तरावर घेतली जाईल. जिल्हा स्तरावर विजेता ठरलेला संघ राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरेल. आंतरशालेय स्पर्धा दहा नोव्हेंबरपर्यंत  तर जिल्हास्तरीय स्पर्धा 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत आयोजित केल्या जातील. जिल्हा स्तरावर विजेता ठरणारा संघ राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरेल. राज्यस्तरावरील विजेता शाळेचा संघ राष्ट्रीय स्तरावरील फेरीसाठी पात्र ठरणार आहे. या स्पर्धेसाठी नववी ते बारावीत शिकणारे विद्यार्थी पात्र असतील.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *