सोलापूर दि. 16 :- जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांच्या यशस्वितेमुळे भुगर्भातील पाणीपातळीत वाढ होत आहे. जलयुक्तच्या कामांमुळे उपलब्ध होणा-या पाण्याचा शेतीसाठी शास्त्रीय पध्दतीने उपयोग व्हावा, असे मत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या पहाणी प्रसंगी शेतक-यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, मार्डी, व राळेरास येथील जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांची पहाणी जलसंधारण मंत्री प्रा.शिंदे यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शहाजी पवार, उप विभागीय अधिकारी ज्योती पाटील, शिवाजी जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रकल्प संचालक रवींद्र माने यांच्यासह संबंधित गावातील मान्यवर पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
शेतक-यांशी संवाद साधताना प्रा. शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व शेतक-यांना समजले असल्याने अशा प्रकारची चांगली कामे या अभियानातून होत आहेत. कंपार्टमेंट बंडिंग, विहिर पुर्नभरण, ओढा खोलीकरण – सरळीकरण, सिमेंट नालाबांध या कामांमूळे पाण्याचा साठा निर्माण होत आहे. या पाण्यामूळे परिसरातील विहिर, बोअर यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परिसरातील शेतक-यांना त्याचा लाभ होत आहे. या पाण्यामुळे पिके चांगल्या प्रकारे येऊन शेतक-यांची आर्थिक उन्नती साधली जात असल्याचे ते म्हणाले.
प्रा. शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील यतनाळ येथील कंपार्टमेंट बंडिंग व बोअर पुर्नभरण कामाची पहाणी केली. तद्नंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील सिमेंट बंधा-याची पहाणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते सिमेंट बंधा-यातील पाण्याचे पुजन करण्यात आले. नानज व मार्ढी येथील कंपार्टमेंट बंडिंग कामाच्या पहाणी नंतर जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी राळेरास येथील के.टी.वेअर बंधा-याची पहाणी केली. सिमेंट बंधारा व के.टी. वेअर बंधा-यात साचलेले पाणी पाहून त्यांनी समाधानही व्यक्त केले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




