👁 35 Views

कारंबा पंपगृहाचे काम 3 महिन्यात पूर्ण होणार… पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017

मुंबई, दि. १६ : कारंबा पंपगृहाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून या कामाचे १५ दिवसात शॉर्ट टेंडर काढून कामास सुरुवात करावी. येत्या ३महिन्यात हे काम पूर्ण होवून सोलापूर शहराला पाणी उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्याअधिकाऱ्यांना दिले. 
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मागणीच्या अनुषंगाने पुण्यात आज यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी राज्यमंत्री श्री.शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख यांच्यासह आमदार बबनदादा शिंदे,प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य अभियंता विलास रजपूत, अधिक्षक अभियंता श्री. खपोले, श्री. चौगुले आदी मान्यवरउपस्थित होते.
कर्नाटक व अंबालिकाच्या धर्तीवर सिना नदीवरिल रिदोरे, कवे व शिरापूर आणि भिमा नदीवरील पुलुज, आलेगाव तसेच माण नदीवरील मल्लेवाडी येथेयांत्रिकी पद्धतीचे दरवाजे प्रायोगिक तत्वावर यांत्रिकी विभागाकडून डिझाईन करुन घ्यावे, हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच जास्तीत जास्तपाणी साठविण्यात यावे. या कामासाठी विस्तार सुधारणा अंतर्गत सीएसआर, कारखाना, लोकवर्गणी व बिगरसिंचन पाणीपट्टीतून निधीचे नियोजनकरावे, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. शिवतारे यांनी यावेळी दिल्या.   

सोलापूर–विजापूर रोडवरील भिमा व सिना नदीवरील टाकळी, वडकबाळ येथील रोड कम बंधारा बांधण्याचे प्रस्ताव तयार करुन केंद्र शासनास सादरकरण्याच्या सूचना दिल्या. सिना व भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून जून – जुलैमध्ये दरवाजे काढण्यात येतात. त्याऐवजी सोलापूरजिल्ह्यातील पावसाची परिस्थिती व धरणातील शाश्वत पाणीसाठी ५० टक्के असल्याची खात्री करुन नियोजन करावे. सुस्ते – तारापूर येथील बुडीतबंधाऱ्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री श्री. शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. 

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  

संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *