👁 9 Views

कॉंग्रेस (आय) ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी समिर कोळी यांची निवड



पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017

पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व मा.केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक तसेच पंढरपूर कॉंग्रेस (आय) कमिटी मध्ये विविध पदावर काम करुन आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोळी समाजाचे कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे  समीरजी कोळी यांची सोलापूर जिल्हा कॉंग्रेस(आय) ओ.बी.सी.विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी मुंबई येथे ओ.बी.सी विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. प्रमोदजी मोरे  यांनी निवडीचे पत्र दिले. त्या वेळी मा. मोरे साहेब यांनी समीर कोळी यांच्या कार्याची ही पोच कॉंग्रेसने दिल्याचे म्हटले. यावेळी प्रा. अशोक डोळ, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रा.मारुती भोसले, ज्येष्ठ नेते मामासाहेब ङ्गलटणकर,अमर सुर्यवंशी, सोमेश अभंगराव, शिवाजी धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. 
मा. समीर कोळी यांनी निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे, आ.प्रणितीताई शिंदे, मा.आ.प्रकाशजी यलगुलवार, आ.भारत भालके, स.शि.सा.का.चे चेअरमन कल्याणराव काळे, सौ.सुनेत्राताई पवार, सौ.डॉ.साधनाताई उगले,प्रकाश पाटील यांच्या सहकार्यानेच माझी निवड झाल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मा.केंद्रीयमंत्री सुशिलकुमारजी शिंदे साहेब यांच्या आशिर्वादाची शाब्बासकी असून आ.प्रणितीताई शिंदे, आ.भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात ओ.बी.सी.विभागाचे पदाधिकारी निवड करुन नवसंजिवनी देण्याचे काम जोमाने चालू करणार असल्याचे समीर कोळी यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांचे अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध असल्याने विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनीही त्यांचे अभिनंदन केले.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *