👁 7 Views

भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी मृणाल कुलकर्णी

भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी मृणाल कुलकर्णी



पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेला लावणी शो *’माझ्या लावणीचं लावण्य’* या कार्यक्रमाच्या निर्मात्या व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची नुकतीच मुंबई येथे भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या कार्यक्रमामध्ये आ.प्रशांत पाटील, भाजपा  कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केनेकर, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोरक्ष धोत्रे व कल्याण भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांचे प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. व त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. 



मृणाल कुलकर्णी या लावणी नृत्यांगणा आहेत. त्या लावणी कलेच्या माध्यमातून रंगभूमीवर 14-15 वर्ष सेवा करत आहेत. 
त्यांनी पाकीटमार,शाम्या,मदान,ओढ द अॅटराॅक्शन,हिंदी हाॅटेल टाॅस,पतंग या चित्रपटातून काम केले आहे. 
लावणी नृत्यात निपून असणा-या मृणाल कुलकर्णी यांनी ‘स्वामी समर्थ प्राॅडक्शनची’ निर्मीती करून *”माझ्या लावणीचं लावण्य”* या लावणी शो ची निर्मिती केली. व याचा शुभारंभ ही त्यांनी जानेवारी 2017 ला सोलापूरातून केला. 
हा लावणी शो अल्पावधीतच सोलापूरात लोकप्रिय हून सोलापूर च्या लावणी रसिकांची वाहवा मिळवली. 
लावणी नृत्यांगणा व अभिनेत्री म्हणून काम पहात असताना कलाकारांच्या अडी-अडचणी ची मृणाल यांना जाणीव असल्यानेच भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोरक्ष धोत्रे, भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केनेकर व कल्याण भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव आव्हाड यांनी त्यांचेवर भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविलेली आहे. 
मृणाल यांच्या निवडी बद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा.पूनमताई महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *