👁 8 Views

महाराष्ट्र शासन- आजचे महत्वाचे निर्णय व घडामोडी… वॉटर कप स्पर्धेत 75 तालुक्यांतील गावांचा सहभाग – आमीर खान

पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017

वृ.वि. 7320                                                                           1 मार्गशीर्ष, 1939 (सायं.6.05 वा.)
दि. 22 नोव्हेंबर 2017
वॉटर कप स्पर्धेत 75 तालुक्यांतील गावांचा सहभाग – आमीर खान
वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
जलयुक्त गावांना प्रोत्साहन द्यावे
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 22 : पाणी फाउंडेशनची वॉटर कप स्पर्धा ही राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी पूरक आहे. जलयुक्त योजनेतील जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावायासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच या स्पर्धेसाठी पाणी फाउंडेशनला सहकार्य करावे,  असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
राज्य शासनाच्या सहकार्यामुळे वॉटर कप स्पर्धा यशस्वी झाली असून यंदा 75 तालुक्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे अभिनेता आमिर खान यांनी यावेळी सांगितले. अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्त राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस व अभिनेता आमीर खान यांनी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
            मुख्यमंत्री म्हणालेपाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदाही वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील24 जिल्ह्यातील 75 तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सरपंच व उपसरपंच यांना तसेच ग्रामस्थांना तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच या स्पर्धेमध्ये सीसीटीशोष खड्डे आदी नरेगातील कामांचाही समावेश करण्यात यावा. या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होण्यासाठी प्रयत्न करावेत.
            अभिनेते आमिर खान म्हणालेगेल्या दोन वर्षात वॉटर कप स्पर्धेसाठी राज्य शासनाने व प्रशासनाने खूप मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली असून गावे पाणीदार होण्यास मदत झाली आहे. पहिल्या वर्षी तीन तालुके तर दुसऱ्या वर्षी 30 तालुक्याचा समावेश स्पर्धेत होता. यावेळी स्पर्धेत 75 तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये स्पर्धेपूर्वीची गावे व स्पर्धेनंतरची गावेयासंदर्भात प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्याद्वारे लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
वॉटर कप स्पर्धेबरोबरच पाणीदार झालेल्या गावांमधील झुडपे वाढविणेजंगलांचे संवर्धनमृदा आरोग्य व जल व्यवस्थापन आदी चार महत्वाच्या विषयांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचेही श्री. खान यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदेमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशीकृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमारवन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेजलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवलेपाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळडॉ. पोळश्री. ननावरे आदी यावेळी उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००
वृ.वि. 7318                                                                           1 मार्गशीर्ष, 1939 (सायं.5.45 वा.)
दि. 22 नोव्हेंबर 2017
उद्योजकांनी प्लास्टिक बॉटलचा पुनर्वापर करावा
– रामदास कदम
मुंबई, दि. 22 : प्लास्टिक बॉटल बंदीच्या नियमानुसार प्लास्टिक बॉटल उत्पादन कंपन्यांनी विक्री केलेल्या बॉटल बाजारातून पुन्हा संकलीत करून त्याचा पुनर्वापर करण्यासंबंधीचे प्रकल्प तयार करावेत. शासनाची अभ्यास समिती प्लास्टिक बॉटलला पर्याय आणण्यासंदर्भात लवकरच अहवाल सादर करणार आहेअसे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.
मंत्रालयात आज प्लास्टिक बॉटल्सची निर्मिती व पुनर्वापर यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री कदम बोलत होते. या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
श्री. कदम पुढे म्हणालेशासकीय कार्यालय आणि स्टार हॉटेलमध्ये प्लास्टिक बॉटल बंद करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यात करण्यात येणार आहे. यासाठी अभ्यास दौरा करण्यात येणार असून,अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यात येणार आहे. उद्योगांवर विपरीत परिणाम होऊ नये आणि पर्यावरणाचा समतोल राखता यावायाचबरोबर प्लास्टिकला पर्याय आणता येतील का यासंदर्भात उपाय सुचविण्यात येणार आहेत.
प्लास्टिक बॉटलचे पुनर्वापरत्यांचे संकलन उत्पादन कंपन्यांनी करणे आवश्यक आहे. त्याअंतर्गत्‍ विभाजन करूननिर्जंतुकीकरण आणि स्वच्छ करून पुन्हा वापरासाठी उपलब्ध केल्यास नवीन प्लास्टिक बॉटल्सचे उत्पादन कमी होऊ शकेल अशी माहिती श्री कदम यांनी आज दिली.
श्री देसाई म्हणालेप्लास्टिक बॉटलचा पुनर्वापर करण्यासंदर्भात उत्तेजन देणारे उपाय उद्योजकांनी करावेत,त्यासदंर्भातील रिसायकलींग मशिन सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊनजाहिरांतीद्वारे प्रबोधन करावे.
यावेळी पर्यावरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव सतीश गवईमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. एन. अनबलगनमहाराष्ट्र बॉटल असोसिएशनचे विजयसिंग डुबलबिसलेरीच्या संचालक अंजना घोष आदी उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००

वृ.वि. 7319                                                                           1 मार्गशीर्ष, 1939 (सायं.6.00 वा.)
दि. 22 नोव्हेंबर 2017
आदिवासी नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले
रक्तनाते संबधातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश रदद कराण्याची मागणी
मुंबई, दि. 22 : आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या एका२० सदस्यीय शिष्टमंडळाने बुधवारी (दि. २२) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे  भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केली.
जात वैधता प्रमाण पत्राच्या आधारे रक्त नाते संबधातील कुटुंबातील इतर व्यक्तींना कुठलिही तपासणी न करता जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण रदद् करावे तसेच या संदर्भातील दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ चा शासन निर्णय रदद करावा अशी मागणी शिष्ट मंडळाने राज्यपालांकडे केली.
माजी मंत्री मधुकर पिचडशिवाजीराव मोघेपदमाकर वळवीसुहास नाईक तसेच इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००

नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./22.11.2017

वृ.वि. 7321                                                                           1 मार्गशीर्ष, 1939 (सायं.6.05 वा.)
दि. 22 नोव्हेंबर 2017
सोयाबीन खरेदीसाठी खासगी परवानाधारक बाजार परिसरातही केंद्र सुरू करण्याच्या सूचना
मागेल त्याला शेततळे योजनेची कामे
मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 22 : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत कार्यारंभ आदेश दिलेली कामे येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खासगी परवानाधारक बाजार समिती परिसरातही खरेदी केंद्रे सुरू करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
जलयुक्त शिवारमागेल त्याला शेततळेगट शेती योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आदी विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
            जलयुक्त शिवारमधील गेल्या वर्षीच्या कामांना वेग द्यावा. जलयुक्तच्या कामांचे जिओ टॅगिंगचे कामही तातडीने पूर्ण करण्यात यावेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेजलयुक्तमधील कामांची छायाचित्रे जोपर्यंत अपलोड होणार नाहीततोपर्यंत ती कामे पूर्ण झाल्याचे समजले जाणार नाही. मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करावेत. सिमेंट नाला बांधसाठी मेरी संस्थेने तयार केलेला आराखडा वापरण्यासंदर्भात विचार करावा. तसेच जलयुक्त शिवार तसेच नरेगा अंतर्गतची कामे कमी खर्चात व लोकसहभागातून करण्यासाठी नवनवीन प्रयोग करावेत.
            गट शेती योजनेसाठी राज्यातून 686 प्रस्ताव आले आहेत. या सर्व प्रस्तावांची छाननी करून त्यांना तातडीने मान्यता देण्यात यावेत. तसेच ही योजनेत जास्तीत जास्त सहभाग वाढविसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांनाही या योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात विचार करण्यात यावेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात कृषी साधनांची टूल व मशिनरी बँक तयार झाली पाहिजेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सोयाबीनकापूसतूरउडिद आदी शेतमालाच्या खरेदी प्रक्रियेचाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी आढावा घेतला. ते म्हणालेसोयाबीन खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या परिसराबरोबरच खासगी परवानाधारक कृषी उत्पन्न बाजाराच्या परिसरातही खरेदी केंद्रे उभारण्याची व्यवस्था मार्केटिंग फेडरेशने करावीत. तसेच खरेदी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कृषी व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कापसावरील बोंड आळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने विशेष लक्ष घालण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
            प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण)मध्ये अजून अनेक जिल्हे नोंदणी करण्यात मागे पडले आहेत. सर्वच जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत 100 टक्के नोंदणी होण्यासाठी मिशन मोडवर जाऊन कामे करावीत. यासाठी राज्य शासनाकडून निधीची पूर्तता केली जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदेमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशीकृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमारजलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवलेकॉटन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना आदी यावेळी उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००
नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./22.11.2017
वृ.वि. 7316                                                                           1 मार्गशीर्ष, 1939 (दु.3.30 वा.)
दि. 22 नोव्हेंबर 2017
2 कोटी 20 लाखांचा माल जप्त
अवैध कीटकनाशकेखतविक्री विरोधात
कृषी आयुक्तालयाची राज्यभर कार्यवाही
मुंबईदि २२ : अवैध कीटकनाशकांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने राज्यभर भरारी पथकांच्या माध्यमातून कार्यवाही केली आहे. अकोलासांगलीजळगावसह राज्यातील विविध भागांमध्ये केलेल्या कार्यवाहीनंतर विनापरवाना तसेच कालबाह्य कीटकनाशकेरासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानांवर तसेच उत्पादन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साधारण २ कोटी २३ लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकांच्या अवैध साठ्याची जप्ती करण्यात आली आहे. हा साठा साधारणतः २० हजार ७७१ लिटर आहे, अशी माहिती निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप यांनी दिली.  
राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यभर कृषी आयुक्तालय स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या भरारी पथकांनी अकोला येथे विक्रेतेवितरकांचे गोदाम तसेच साठवणूकस्थळांची तपासणी केली. या छाप्यात चार कंपन्यांकडे कीटकनाशक विक्रीचा परवाना नसताना कीटकनाशकांची साठवणूकवितरण व विक्री होत असल्याचे आढळून आले. या कंपन्यांच्या परवान्यांमध्ये कीटकनाशकांचा समावेश नसताना त्यांनी त्याची साठवणूकवितरण व विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून कीटकनाशक जप्त करून त्यांचे  विक्री परवाने परवाने रद्द करण्यात आले आहे.
या कार्यवाहीत कृषी रसायन एक्सपर्ट प्रा. लि.केमिनोव्हा इंडिया प्रा. लि.एफएमसी इंडिया प्रा. लि.,बायोस्टॅड्ट इंडिया प्रा. लि. या कंपन्यांचा एकूण 197.52 लाख रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा विक्री बंद किंवा जप्त करण्यात आला आहे. तसेच भारत इन्सेक्टीसाईडमे. रेनबो क्राप हेल्थ लि. या कंपन्यांच्या गोडावूनमधून एकूण२६ लाख ६६ हजार रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. हा साठा साधारणतः २० हजार ७७१ लिटर इतका आहे.
खत उत्पादन कंपन्यांवरही कार्यवाही
सांगली जिल्ह्यातील कार्यवाहीत दोन खत उत्पादक कंपन्यांवर  फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरारी पथकाने मे. मायक्रो लॅबकुपवाड एमआयडीसी या ठिकाणी छापा घातला. तेथे एक ट्रकमध्ये एका बॅगमधून सेंद्रिय खत मे. क्लासवन ॲग्रो बायोटेक ॲण्ड फर्टिलायझर (येळावीता. तासगाव) या कंपनीचे खत मे. मायक्रो लॅब या कंपनीचे नाव PROM (Phosphate Rich Organic Manure) खत म्हणुन रिपॅकिंग केले जात होते. दुसऱ्या ट्रकमध्ये 50 किलोच्या 120 पोती PROM या नावाने भरल्याचे आढळले. तसेच गोदामात सिलीकॉन व सेंद्रिय खताचा साठा आढळला.  या उत्पादकास या खतांचा उत्पादन व विक्री परवाना नाही. या कंपनीने खत नियंत्रण आदेश व जीवन आवश्यक अधिनियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या कारवाईत 50.85 मे. टन खत साठा (किंमत रु. 6 लाख 26 हजार 650) व दोन ट्रक (अंदाजे किंमत रु. 15 लाख) जप्त करण्यात आले व या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुपवाड एमआयडीसी येथील मे. भाटिया भूमिपुत्र ट्रेडको प्रा. लि. या खत उत्पादक कंपनीचे गोदाम तपासणी केली असता सिलीकॉन व दुय्यम अन्नद्रव्ये मिश्र खताचे विना परवाना उत्पादन व विक्री केल्याचे आढळले. या कंपनीने खत नियंत्रण आदेश व जीवन आवश्यक अधिनियम चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या कारवाईत 163.17 मे.टन खत साठा (किंमत रु.2 लाख 78 हजार 307) जप्त करण्यात आला व या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ॲम्पल ॲग्रो केम इंडस्ट्रीज उत्पादीत नागलवाडी (ता. चोपडाजि. जळगाव) या कंपनीचा पाण्यात विद्राव्ये खत 0:52:34 चा नमुना अप्रमाणित आल्याने (मुलद्रव्यात 52 ऐवजी 51.15 ने कमी,  K 34 ऐवजी 33.77 ने कमी) मे. ॲम्पल ॲग्रो केम इंडस्ट्रीज (इंदौरजि.जळगाव) कंपनीस निर्गमित केलेले विक्री प्राधिकार पत्र कायम स्वरूपी रद्द करण्यात आले आहे. तसेच उत्पादक मे. ॲम्पल ॲग्रो केम इंडस्ट्रीज (इंदौरजि. जळगाव) व वितरकांवर नांदेड जिल्ह्यात या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलैपासून या कारवाया करण्यात येत आहे.
क्षेत्रिय स्तरावरील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी अधिक जागरूक राहून तसेच स्थानिक स्तरावर सर्व संबंधित घटकांशी समन्वय ठेवून प्रभावी संनियंत्रण करावेतअसे निर्देश कृषी आयुक्तालयातील निविष्टा व गुणवत्ता नियंत्रण संचालक यांनी दिले आहेत.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००

वृ.वि. 7317                                                                           1 मार्गशीर्ष, 1939 (दु.4.55 वा.)
दि. 22 नोव्हेंबर 2017
पुनर्वसन कामाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या
म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि.22 : सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसनाच्या कामाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात आज आयोजित पत्राचाळ आणि गोरेगावच्या मीठानगर वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेअनेक वर्षापासून विकासकांनी घराचे बांधकाम रखडवले आहे. चाळीतील रहिवाश्यांचे घरभाडे विकासकाने वर्षभरापासून दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. 
या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाईमहिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूरगृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमारम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकरमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे आदी उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *