पंढरपूर Live 7 December 2017
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार
– राज्यमंत्री विजय देशमुख
मुंबई, दि ०७ :राज्यातील जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, पद पुनरुज्जीवन व इतर समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील.त्या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाईल असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज सांगितले.
भारतीय जनता कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात श्री. देशमुख यांची आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत भारतीय जनता कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदने श्री.देशमुख यांना दिली. यावेळी श्री देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेतील आरोग्य सहाय्यकांना लवकरच त्यांच्या सेवा जेष्ठते नुसार पदोन्नती देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. याबरोबरच रिक्त पदे भरण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले जाईल.त्यासाठी जिल्हा परिषदांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागवण्यात आला असून रिक्त पदे भरल्यानंतर त्यांचे वेतन नियमित होण्यासाठी तरतूद केली जाईल.आरोग्य पर्यवेक्षकांना आवश्यक सोयी सुविधा पुराविण्यात येतील.
राज्यभरात ६ हजारांवर बंधपत्रिका कंत्राटी आरोग्य सेविका आहेत. नव्याने परीक्षा घेऊन पदे भरण्यापेक्षा या आरोग्य सेविकांची एकत्रित सेवा जेष्ठता यादी तयार करून निवड समिती नेमून पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.या बरोबरच राज्य जिल्हा पातळीवर आदर्श आरोग्य कर्मचारी दिले जातील.राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्न शील आहे.आरोग्य सहाय्यक या पदाची ६ व्या वेतन आयोगामध्ये प्रलंबित राहिलेली वेतनत्रुटी दुरुस्त करण्याबाबत प्रयत्न करू असे आश्वासन या वेळी श्री देशमुख यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी आरोग्य विभागाचे (हिवताप) सहसंचालक एम. एस. डिग्गीकर, ग्राम विकास विभागाचे उपसचिव गिरीश भालेराव, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर, भारतीय जनता कामगार महासंघाचे अध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
*******
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची
रक्कम तत्काळ जमा करण्याचे आदेश
एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून
वंचित राहणार नाही: मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई, दि. 7 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवल्यानंतर आतापर्यंत 41 लाख शेतकरी खात्यांसाठी 19,537 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आता बँकांनी ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
या ऑनलाईन प्रक्रियेत एकूण 77 लाख खाते राज्य सरकारला प्राप्त झाले. पुन्हा पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे 69 लाख खात्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. शासनाने आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी 19 हजार 537 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. यात वन टाईम सेटलमेंटसाठी4673 कोटी रुपये आहेत. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांना शाखानिहाय देण्यात आली असून बँकांनी ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी, त्यासाठी बँकांनी आपली स्थानिक यंत्रणा अधिक सक्षम करावी, तसेच या सर्व खातेदारांना रब्बी हंगामासाठी कर्ज देण्याचीही व्यवस्था करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृहात आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माहिती तंत्रज्ञान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्यासह बँकर्स समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, 41 लाख खातेधारकांशिवाय आता उर्वरित खातेधारकांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी बँकांनी विशेष चमू गठीत कराव्यात आणि या प्रक्रियेत अधिकाधिक शेतकऱ्यांना लवकरात लवकर फायदा मिळण्यासाठी सहकार्य करावे. सरकारच्या वतीने बँकासोबत समन्वयासाठी तीन चमू गठीत करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत बँकांनी मोठे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. यापुढे सुद्धा असेच काम करून एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी बँकांनी हे काम पंधरा दिवसात पारदर्शकपद्धतीने पूर्ण करावे, त्यांना सहकार विभागाचे तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी मदत करतील. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया अशीच सुरु राहील, असेही ते म्हणाले.
वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना हप्ते पाडून द्यावेत, जेणेकरून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतील. त्यासाठी शेतकऱ्यांशी बँकांनी संवाद साधावा व त्यातून नावीन्यपूर्ण अशी योजना आखावी व खातेदाराचे बँक खाते पुर्नजीवित करावे. महाराष्ट्राने आतापर्यंत कर्जमाफीचे काम देशाला पथदर्शी ठरावे इतक्या पारदर्शकपद्धतीने केले आहे, पुढेही ते याचपद्धतीने पुर्णत्वाला न्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी करतांना बँकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षाही त्यांनी जाणून घेतल्या.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
00000
वृ.वि. 7513 16 मार्गशीर्ष, 1939 (6.15)
दि. 7 डिसेंबर, 2017
मंत्रालयात ग्रामविकास मंत्री यांचा सरपंच दरबार : पहिलाच अनोखा उपक्रम
राज्यातील सरपंचांचा उत्तम प्रतिसाद
सरपंचांच्या मानधन वाढीसाठी शासन सकारात्मक,
सरपंचांना मिळणार ओळखपत्र
–ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. 7 : ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंच दरबार आयोजित करुन त्यांच्याकडून गावाच्या विकासाबद्दलचे विचार जाणून घेतले. सरपंचांचे मानधनासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगून प्रत्येक सरपंचाला ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित सरपंच दरबारात श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याबरोबर नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. राज्यातील पहिल्यांदा निवडून आलेल्या तरुण सरपंचांची संख्या मोठी आहे. त्यांना गावांच्या विकासाबद्दल आणि शासनाच्या विविध योजनांविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सरपंचासाठी वेळ राखून ठेवणार असल्याचे सांगून त्यांच्याशी सामाजिक माध्यमांद्वारे थेट संपर्क साधणार असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. सरपंच हा ग्रामविकासाचा पाया मजबूत करणारा महत्वाचा घटक असल्याने त्याच्याकडून गावाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे.
श्रीमती मुंडे म्हणाल्या की, गावात उत्पन्न वाढविण्यासाठी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी परवानगी देता येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात ग्रामसचिवालय बांधण्यात येणार आहे. ज्यामध्ये गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्या कार्यालयासह इतर कार्यालये एकत्रित बांधण्यात येणार आहेत. विविध विकास कामे करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून सरपंचांनी याचा गांभीर्याने विचार करावा. सरपंचांनी गावाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे असे आवाहन करुन गाव हागणदारीमुक्त, सांडपाणी मुक्त आणि पाणंद मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. शासनाच्या विविध निर्णयाचा अभ्यास करुन शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,आमदार, खासदार आदिंचा निधी आणण्यासाठी पाठपूरावा करुन नियोजनपूर्वक कामे केली तर गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी सरपंचांचे योगदान महत्वाचे आहे. रोजगार हमी योजनेतून गावातील अनेक कामे होऊ शकतात. फक्त योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गावात नागरिकांना लागणारी आवश्यक प्रमाणपत्र गावातच मिळण्याची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आलेली आहे.
सरपंचांनी मंत्री मुंडे यांचे मानले आभार
यावेळी सरपंचांनी श्रीमती मुंडे यांच्याशी चर्चा करुन विविध समस्या मांडल्या. श्रीमती मुंडे यांनी सर्व प्रश्नांची सकारात्मक उत्तरे दिली. यावेळी सर्व सरपंचांनी सरपंच दरबार आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
-x-x-x-x-
वृ.वि. 7514 16 मार्गशीर्ष, 1939 (6.35)
दि. 7 डिसेंबर, 2017
मंत्रालयात शिक्षकांना प्रवेश बंदीचा दावा खोटा
- शिक्षणमंत्री विनोद तावडे
मुंबई, दि. 7 : मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्था हा विषय पूर्णपणे पोलिसांशी संबंधित आहे. कोणत्या व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश द्यावेत व देऊ नयेत या संदर्भात शिक्षणमंत्री म्हणून आपण कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश पोलिस यंत्रणेला दिलेले नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षकांना मंत्रालयात प्रवेश देऊ नयेत, अशा सूचनाही कोणत्याही यंत्रणेला दिलेल्या नाहीत. अनेक शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनीधींनी त्यांच्या विविध प्रश्नांसाठी यापूर्वीही शिक्षणमंत्री म्हणून भेट घेतली आहे तसेच आजही आपली मंत्रालयात भेट घेतली आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) तर्फे करण्यात आलेला दावा हा पूर्णपणे खोटा चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे श्री. तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी शिक्षकांना मंत्रालयात प्रवेश नाकारल्याचा दावा टीडीएफचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केला आहे. याबाबत श्री. तावडे यांनी स्पष्ट केले की, शिक्षकांना मंत्रालयात कोणत्याही प्रकारची प्रवेश बंदी करण्यात आलेली नाही. राज्यातील नागरिक आपल्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने मंत्रालयात येत असतात. मंत्रालयीन सुरक्षा कार्यालयाकडून मिळाल्यानंतर ठराविक व्यक्तिंना प्रवेश देताना पोलिस यंत्रणा आवश्यक ती दक्षता घेत असते.
००००
वृ.वि. 7510 16 मार्गशीर्ष, 1939 (5.10)
दि. 7 डिसेंबर, 2017
नागरी संरक्षण दलात 19 व 20 डिसेंबर रोजी स्वयंसेवक नोंदणी
मुंबई, दि. 7 : नागरी संरक्षण दलाच्या पुणे, नाशिक, उरण, तारापूर, ठाणे व बृहन्मुंबई कार्यालयात स्वयंसेवक निवडण्यात येणार आहेत. यासाठी दि. 19 आणि 20 डिसेंबर 2017 रोजी, नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय आवार, क्रॉस मैदान, धोबी तलाव, मुंबई येथे सकाळी 7.30 ते 5.00 या वेळेत नोंदणी प्रक्रिया स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करता येणार आहे.
नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्याचे वय 18 वर्षे व किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून उमेदवारांचा पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल असणे आवश्यक आहे. स्वयंसेवक नोंदणीकरिता वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र,आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
स्वयंसेवकांना मैदानी परीक्षा द्यावी लागणार असून, धावणे चाचणीकरिता पुरुषांनी 1600 मीटर 6 मिनिटे 30 सेंकदात तर महिलांनी 800 मीटर (3 मिनिटे 20 सेंकदात पुर्ण करणे आणि गोळाफेक पुरुषांनी 4.90 मीटर, तर महिलांनी 4.50 मीटर गोळाफेक पूर्ण करावयाचे आहे.) अधिक माहितीकरिता अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण, बृहन्मुंबई येथे 022-22013411 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी नोंदणी करावी असे आवाहन उपसंचालक, नागरी संरक्षण यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
०००००
वृ.वि. 7511 16 मार्गशीर्ष, 1939 (5.20)
दि. 7 डिसेंबर, 2017
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर
मुंबई, दि. 7 : – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र कार्यक्रमात वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन, दुग्धविकास,मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दुरदर्शच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार, दि. 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे.ही मुलाखत निवेदक हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.
उत्कृष्ट दुग्धोत्पादन देणा-या गोवंशीय व म्हैसवर्गीय पशुंचे संवर्धन, कुक्कुटपालन तसेच अंडीउत्पादन वाढावे यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्याकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना, नीलक्रांती धोरण, मत्स्यसंवर्धनासाठी शासन करीत असलेले प्रयत्न व राज्यात वस्त्रोद्योग वाढीसाठी देण्यात येणाऱ्या चालना, वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगार संधी, याबरोबरच आगामी काळातील वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या सविस्तर वाटचालीच्या संदर्भात सविस्तर माहिती श्री. खोतकर यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.
०००००
वृ.वि. 7505 16 मार्गशीर्ष, 1939 ( 02.30)
दि. 7 डिसेंबर, 2017
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2017 चा निकाल जाहीर
मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा2017 चा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर), द्वितीय क्रमांक दीपक कुंभार (कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक अंशुमन पोयरेकर(मुंबई) यांनी पटकावला आहे.
या स्पर्धेतील पाच उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रशांत खरोटे (नाशिक), राजेंद्र धाराशिवकर (उस्मानाबाद),सुनिल बोर्डे (बुलढाणा), उमेश निकम(पुणे), सुशिल कदम(नवी मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज निकाल जाहीर केला. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी तीन हजार रूपये प्रदान केले जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 3,210 छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यातील दर्जेदार छायाचित्रांचे राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार असून प्रदर्शनाची सुरूवात नागपूर येथून होणार आहे.
प्राप्त छायाचित्रातून विजेत्यांची निवड आणि प्रदर्शनासाठी दर्जेदार छायाचित्रांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कामकाज पाहिले. या समितीत संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर,ज्येष्ठ छायाचित्रकार नितीन सोनवणे, संजय पेठे, अनिल छड्डा यांचा समावेश होता.
राज्यभरात लवकरच या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
००००
वृ.वि. 7507 16 मार्गशीर्ष, 1939 ( 02.30)
दि. 7 डिसेंबर, 2017
सशस्त्र बल ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
मुंबई, दि. 07: सशस्त्र बल ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आज करण्यात आले.
यावेळी कामगार आणि माजी सैनिकांचे कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार मंगलप्रभात लोढा,सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दिपेंद्र कुशवाह, व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा, लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग, एअर मार्शल मायकल फर्नांडिस, संचालक कर्नल सुहास जलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सैनिक कल्याण विभागाच्या वतीने ध्वजदिनानिमित्त ‘सैनिक मित्र’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गेल्या वर्षात उत्कृष्ट निधीसंकलन करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
००००
वृ.वि. 7508 16 मार्गशीर्ष, 1939 ( 04.15)
दि. 7 डिसेंबर, 2017
‘दिलखुलास’ कार्यक्रमात हर्षल विभांडीक यांची मुलाखत
मुंबई, दि.7 – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्ह्यात ‘डिजिटल शाळा‘ हा उपक्रम राबविणारे हर्षल विभांडीक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. 8 आणि शनिवार दि. 9 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत वर्षा फडके- आंधळे यांनी घेतली आहे.
मुळचे धुळे जिल्ह्यातील श्री. विभांडीक सध्या न्युयॉर्क येथे नोकरी करतात. आपल्या जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातही डिजिटल शाळा सुरु कराव्यात ही संकल्पना कशी सुचली, या उपक्रमाच्या वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, धुळे जिल्हा परिषदेच्या 1103 शाळा कशा डिजिटल झाल्या आहेत, यांमध्ये स्वयंसेवी संस्थाचा आणि प्रेरणा सभांच्या माध्यमातून झालेले काम याबाबत सविस्तर माहिती श्री. विभांडीक यांनी ‘दिलखुलास’या कार्यक्रमातून दिली आहे.
******
वृ.वि. 7509 16 मार्गशीर्ष, 1939 (4.15)
दि. 7 डिसेंबर, 2017
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर









