👁 10 Views

नागपूर हिवाळी अधिवेशन व विधानसभा कामकाकाज संबंधी महत्वाच्या बातम्या

नागपूर हिवाळी अधिवेशन व विधानसभा कामकाकाज संबंधी महत्वाच्या बातम्या 
पंढरपूर Live 21 December 2017



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

हिवाळी अधिवेशन, नागपूर
दिनांक : 20 डिसेंबर 2017

माहिती अधिकाराचा गैरवापर
होत असल्यास कारवाई करु
–       राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील
नागपूरदि. 20 : माहिती अधिकार कायद्याचा कोणी गैरवापर करीत असल्याबाबत पुरावे असल्यास त्याबाबत पोलीस ठाणे किंवा संबंधीत प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रार करावीत्यावर कार्यवाही केली जाईलअसे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
ठाणे शहरात अनेक जण माहिती अधिकाराचा गैरवापर करीत असल्याबाबत सदस्य प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले कीठाणे महापालिकेकडे माहिती अधिकारातून दरवर्षी साधारण 15 हजार 600 अर्ज प्राप्त होतात. ठराविक व्यक्ती वारंवार अर्ज करीत असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत असले तरी माहिती अधिकारात अका व्यक्तिने किती अर्ज करावेत यावर बंधन नाही. माहिती अधिकार अधिनियमातील नियम 8 व 9 मध्ये समाविष्ठ बाबींसंदर्भात माहिती देण्याचे बंधन नाही. उर्वरीत बाबींसंदर्भात माहिती उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. काही प्रकरणांमध्ये तक्रार करुन कालांतराने ती मागे घेत असल्याचेही दिसून आले आहे. अशा प्रकरणातं चौकशी बंद न करता ती पूर्ण करण्याचा पर्याय महापालिकेसमोर खुला आहे. शहर विकास विभागाच्या मंजुऱ्या व अन्य ज्या बाबींसाठी माहिती अधिकार अर्ज प्राप्त होतात अशा बाबींची माहिती वेबसाईटवर टाकल्यास अर्जाची संख्या कमी होऊ शकते. याबाबत महापालिकेस कळविण्यात येईलअसे त्यांनी यावेळी सांगितले.
००००
नागपुरातील इनर रिंग रोडच्या कामासाठी
स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलातून कपात         महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
नागपूरदि. 20 : रस्त्यांच्या कामासाठी वापरलेल्या गौण खनिजाच्या वापरासाठीचे स्वामित्व धन संबंधीत कंत्राटदारांनी भरले की नाही याची खात्री करुनच त्यांना अंतिम बील दिले जाते. नागपुरातील इनर रिंग रोडची सुधारणा करण्याचे काम अजून प्रगतीत असून हे काम करणाऱ्या कंत्राटदारास प्रदान करण्यात आलेल्या देयकांमधून गौण खनिजासाठीच्या स्वामित्व धनाच्या फरकाच्या अनुषंगाने 58.47 लाख रुपये इतक्या रकमेची कपात करण्यात आली आहेअशी माहिती महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
आमदार सर्वश्री अमर काळेविजय वडेट्टीवाररणजीत कांबळेप्रा. विरेंद्र जगतापॲड. यशोमती ठाकूर आदींनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले कीनागपूर शहरातील अंतर्गत वळणमार्गाची सुधारणा करण्याचे काम आर. पी. एस. इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्याकडे आहे. या कामाची किंमत 204.62 कोटी रुपये इतकी आहे. सध्या 115 कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून कंत्राटदारास 79.49 कोटी रुपयांचे देयक अदा करण्यात आले आहे. या कामामध्ये वापरण्यात आलेल्या 81 हजार 124 ब्रास खनिजावर देय स्वामित्व धन हे एकूण 3 कोटी 24 लाख रुपये असून ते शासनास अदा केल्याबाबतचे ट्रान्झीट पास कंत्राटदाराने सादर करणे आवश्यक आहे. तथापिकंत्राटदाराने 69 हजार 955 ब्रास खनिजाच्या स्वामित्व धनाच्या 2 कोटी 80 लाख रुपयांच्या पावत्या (ट्रान्झीट पास) सादर केल्या आहेत. 11 हजार 169 ब्रास खनिजाच्या 44.67 लाख रुपयांच्या पावत्या सादर केलेल्या नाहीत. त्यामुळे कंत्राटदारास प्रदान करण्यात आलेल्या देयकांमधून स्विमित्व धनाच्या फरकाच्या अनुषंगाने 58.47 लाख रुपये इतक्या रकमेची कपात करण्यात आली आहेअसे त्यांनी सांगितले.
हे काम प्रगतीत असल्याने कंत्राटदाराने वेळोवेळी सादर केलेल्या स्वामित्व धनाच्या पावत्यांनुसार ताळमेळ घालण्यात येतो किंवा प्रचलीत पद्धतीप्रमाणे स्वामित्व धन मोकळे केल्याचे प्रमाणपत्र (royalty clearance certificate) राजस्व विभागामार्फत कंत्राटदारास सादर करणे आवश्यक असते. कंत्राटदाराच्या अंतिम देयकातून देय स्वामित्व धन व सादर केलेल्या ट्रान्झीट पासनुसार एकूण फरकाची रक्कम वसूल करण्यात येऊन ती शासन जमा करण्यात येते. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत नाहीअसेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
००००
विधानभवनाच्या प्रांगणात उद्या मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
            नागपूरदि. 20 : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात मौखिक आरोग्य तपासणी राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून उद्या दि. 21 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळातील सदस्य विधानपरिषद व विधानसभेचे सदस्य तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मौखिक तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे दिली. विधानभवनाच्या प्रांगणातील शासकीय दवाखान्यासमोर हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
000
विधानसभा प्रश्नोत्तरे :
प्र.क्र. 96383
नाशवंत माल योग्य बाजारभावासाठी
स्थापन समितीचा अहवाल महिन्याभरात
         पणन मंत्री सुभाष देशमुख
            नागपूर, दि. 20 : नाशवंत मालाला योग्य बाजारभाव मिळण्याकरिता गठीत केलेल्या समितीच्या पाच ठिकाणी बैठका झाल्या असून, पुढील महिनाभरात त्यांचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
            सदस्य अस्लम शेख यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. देशमुख म्हणाले, 11 सदस्यीय असलेल्या या समितीच्या नागपूर, पुणे, वर्धा, नाशिक, सोलापूर अशा पाच ठिकाणी बैठका झाल्या आहेत. त्याचा अहवाल महिन्याभरात अपेक्षित असून  त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल. यासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान एका उपप्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, केळी पिकासाठी विशेष बाब म्हणून जळगांव येथे या समितीची बैठक घेतली जाईल. त्याचबरोबर समितीमध्ये केळी उत्पादन जास्त असणाऱ्या विभागांचा एक प्रतिनिधी देखील सदस्य म्हणून नियुक्त केला जाईल.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री. अजित पवार, भिमराव धोंडे, हरिभाऊ जावळे, श्रीमती दिपीका चव्हाण यांनी भाग घेतला.
00
प्र.क्र. 97617
आश्रमशाळांच्या बांधकामांना गती मिळण्याकरिता
आदिवासी विभागात स्वतंत्र बांधकाम कक्ष
                                                  – आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा
            आदिवासी विभागाच्या आश्रम शाळा, वसतीगृह यांच्या बांधकांमांना गती मिळावी याकरिता आदिवासी विभागात स्वतंत्र बांधकाम कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्या माध्यमातून या कामांना पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
            सदस्य सुरेश लाड यांनी कर्जत व पेण तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळांच्या समस्यांबाबत प्रश्न विचारला होता. या संदर्भात उत्तर देताना श्री. सवरा म्हणाले की, कळंब ता. कर्जत येथील शाळा ही पेण प्रकल्पांतर्गत असून ही शाळा भाड्यांच्या इमारतीत असल्याने तसेच या शाळेत विद्यार्थी संख्या कमी असल्याने ती नजिकच्या शाळांमध्ये समायोजित करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील अन्य चार आश्रम शाळांमध्ये कळंब येथील शाळेतील 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती भारती लव्हेकर, श्री. पांडूरंग बरेरा यांनी भाग घेतला.
00
प्र.क्र. 99477
शेतकऱ्यांच्या वीजबिलांच्या दुरुस्तीसाठी फिडरनिहाय कॅम्प
                                                        – ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
            शेतकऱ्यांची वीजबिले दुरुस्त करण्यासाठी फिडरनिहाय कॅम्प लावण्यात येतील. विना नोटीस वीज कनेक्शन खंडीत करणार नाही. ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यासाठी गेल्या तीन वर्षासाठीचे तीन हजार रुपये शेतकरी बांधवांनी अदा करावेत, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
            सदस्य डी. एस. अहिरे यांनी धुळे जिल्ह्यातील कापडणे उपकेंद्राअंतर्गत असलेले रोहीत्र बंद करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. बावनकुळे म्हणाले की, घरगुती ग्राहकांनी वीजेचे बिल महिनोमहिने थकीत केल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तीन-तीन वर्षे नोटीस देऊन देखील वीज बिले भरली जात नाहीत. शेतकरी बांधवांच्या वीज बिलाची दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी फिडरनिहाय कॅम्प लावण्यात येतील. दुष्काळ काळातील वीज बिलात देखील दुरुस्ती केली जाईल. प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या वीज बिलाची दुरुस्ती करुन समायोजन करुन घ्यावे. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरुन जेवढे कनेक्शन असतील त्याचे तीन वर्षासाठी तीन हजार रुपये भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर सुरु होणार नाही, अशी माहिती श्री. बावनकुळे यांनी दिली.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, अजित पवार, राजेश टोपे, राजाभाऊ वाजे, सुभाष साबणे यांनी भाग घेतला.
00
प्र.क्र. 97400
तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची सोय
                                        -पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत
            तूरीच्या खरेदीसाठी यावर्षापासून शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी करण्यात येत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
            सदस्य डॉ. मिलींद माने यांनी जालना जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर तूर विक्रीमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे की, या संदर्भात चंदनझिरा ता. जालना येथील पोलीस ठाण्यात 49 शेतकरी, 19 व्यापारी व अन्य दोन व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            यावेळी झालेल्या चर्चेच्या उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले की, यावर्षी तुरीच्या खरेदीसाठी नाफेडमार्फत केंद्र सुरु केले जाणार आहे. त्याचबरोबर खरेदी केंद्रांवर शेतकरी बांधवांना ऑनलाईन नोंदणीदेखील करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तुरीमध्ये आर्द्रता बाराच्यावर आल्यास त्यात सवलत देण्याबाबत केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विरेंद्र जगताप, अनिल कदम यांनी भाग घेतला.
00
प्र.क्र. 102955
विदर्भ व मराठवाड्यातील कृषी पंपांच्या वीज जोडणीकरिता विशेष योजना
                                                                – ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
            राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत ऑक्टोबर अखेरपर्यंत 26 हजार 356 कृषी पंपांना वीज जोडणी करण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाड्यातील कृषी पंपांच्या वीज जोडणीकरिता विशेष योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
            सदस्य सर्वश्री अब्दुल सत्तार, कुणाल पाटील, श्रीमती यशोमती ठाकुर, निर्मला गावीत आदींनी विदर्भ व मराठवाड्यातील कृषी पंपाचा अनुशेष दूर करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ऊर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे की, विदर्भ व मराठवाड्यामध्ये मार्च 2016 अखेर 86 हजार 870 कृषी पंपांना वीज जोडणी प्रलंबित होती. सन 2016-17 मध्ये विविध योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील 71 हजार 944 कृषी पंपांना वीज जोडणी करण्यात आली. सन 2017-18 मध्ये ऑक्टोबर 2017 अखेर 26 हजार 356 कृषी पंपांना जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित कृषी पंपांचे वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
00

प्र.क्र.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासंदर्भात
साळुंखे समितीच्या उपाययोजनांवर अंमलबजावणी सुरु
                                                -आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती
            राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांसाठी नेमलेल्या डॉ.सुभाष साळुंखे समितीने सूचविलेल्या उपाययोजनांवर अंमलबजावणी सुरु असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.
            विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, अमिन पटेल आदींनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री यांनी सांगितले की, आदिवासी विकास विभागाने निवृत्त आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने 19 ऑक्टोबर, 2016 रोजी राज्यपालांना अहवाल सादर केला, त्यानुसार सन 2001 ते 2016 या शैक्षणिक वर्षामध्ये आश्रमशाळेतील 1077 विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. त्यात 110 विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला असून लैंगिक शोषणामुळे मृत्यू झाल्याची बाब अहवालात नमूद नाही.
            या समितीने सादर केलेल्या अहवालात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी 18 अल्पकालिन व नऊ दीर्घकालिन स्वरुपाच्या उपाययोजना सूचविल्या आहेत. त्यापैकी बहुतांश शिफारशींवर तातडीची अंमलबजावणी सुरु केली असल्याचे आदिवासी विकासमंत्र्यांनी म्हटले आहे.
00
विधानसभा लक्षवेधी :
वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत
15 दिवसात संबंधित यंत्रणेंची बैठक घेणार
                                                – नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील
            नागपूर दि. 20 : मुंबई-ठाणे महानगर क्षेत्रातील तसेच राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत येत्या 15 दिवसात सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल. दोन महिन्यामध्ये फेरीवाला धोरण तयार करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
            सदस्य आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यातील सर्व महापालिकांना वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत निर्देश देण्यात येतील. फेरीवाला धोरण निश्चित करण्यात येणार असून सर्वत्र टाऊन व्हेंडिंग समिती स्थापन केल्या जातील. रेल्वे हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तसेच या विक्रेत्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी, विक्रेत्या संघटना, पालिका आयुक्त, रेल्वे व पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक 15 दिवसात घेण्यात येईल, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनिल प्रभू, मंगलप्रभात लोढा यांनी भाग घेतला.
00

विधान परिषद इतर कामकाज
वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत
विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करणार
                        – पर्यावरणमंत्री रामदास कदम
नागपूर, दि. 20 : जागतिक तापमान वाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.
            सदस्य हेमंत टकले यांनी नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. श्री. कदम म्हणाले की, हा खूप मोठा विषय असून त्यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल.
            वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत बोलताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, पर्यावरण बदलामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा धोका अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे. प्रदुषणामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंची तसेच डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू वरील लसीवर दरवर्षी संशोधन करुन आंतरराष्ट्रीय बाजारातून मागवावी लागते. सध्या होत असलेल्या प्रदुषणावर उपाययोजना करण्याची गरज असून कार्बन क्रेडीटचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. घर अथवा इतर ठिकाणातून बाहेर पडताना रेफ्रिजरेटर, ए.सी. बंद करुन बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळे तापमानवाढीवर नियंत्रण आणता येणे शक्य आहे.
            पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे- पाटील म्हणाले की, हरीतगृह वायूंमुळे वातावरणातील उष्णता रोखून ठेवली जाते. मोठ्या शहरात प्रदूषणही वाढत आहे. त्यादृष्टीने मोठ्या शहरातील घनकचरा व्यवस्थापन तसेच बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी राखून ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
            या चर्चेत सदस्य जयंत पाटील, डॉ. निलम गोऱ्हे, हुस्नबानू खलिफे, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.
0000

विधानपरिषद इतर कामकाज-
ओखीमुळे बाधित शेतकरी व मच्छीमारांसाठी मदतीची
– चंद्रकात पाटील यांच्याकडून घोषणा
नागपूरदि. 20 : ओखी वादळामुळे बाधित झालेल्या पिकांसाठी तसेच मच्छीमारांसाठी मदतीची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत आज केली.
            सदस्य सुनिल तटकरे यांनी उपस्थित केलेल्या नियम 97 वरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले कीदि. 4 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्येभाजीपालाआंबाकाजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकाचे सुमारे 300 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच रत्नागिरीसिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या बोटी आणि मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ 7 डिसेंबर रोजी शासनाने दिले आहेत. पंचनामे योग्यरित्या व्हाव्यात यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यांबाबत कोठे काही तक्रारी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या जातील असेही ते म्हणाले.
            ते पुढे म्हणाले कीओखी वादळामुळे अंशत: नुकसान झालेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 4 हजार 100 रुपयेपूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 9 हजार 600 रुपयेअंशत: नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी 2 हजार 100 रुपये तर पूर्णत: नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी 2 हजार 600 रुपये मदत देण्यात येईल. नुकसानग्रस्त कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी 6 हजार 800 रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी 13 हजार 500 रुपये तर बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्यात येईल. घोषित केलेली नुकसान भरपाईची मदत केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून (एनडीआरएफ) निधी येईपर्यंत वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून ही मदत तात्काळ देण्यात येणार आहे.
            तत्पूर्वी श्री. पाटील यांनी माहिती दिली कीओखी वादळाबाबत दि. 3 व 4 डिसेंबर रोजी समुद्रकिनाऱ्यावर धोक्याचा इशारा (अलर्ट) देण्यात आला होता. तरीही समुद्रात गेलेल्या सर्व 2 हजार 606 बोटींना योग्यरित्या संदेशयंत्रणा राबवून कोणतीही जीवितहानी न होता समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. केरळतामिळनाडूगोवा तसेच कर्नाटक राज्यातील 389 बोटी भरकटून आपल्या समुद्रकिनाऱ्यावर आल्या होत्या. त्यावरील 2 हजार 885 खलाश्यांची निवासाचीजेवण- खाण्याची व परत जाण्यासाठी बोटींना डिझेल देण्याची अशी सर्व व्यवस्था राज्य शासनाने केली. त्यासाठी 2 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली.
            या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकरजयंत पाटीलश्रीमती हुस्नबानू खलिफे यांनी सहभाग घेतला.
००००

उडान कार्यक्रमांतर्गत नाशिक व जळगाव
येथून 23 डिसेंबरपासून विमानसेवा सुरु
        नागपूर, दि. 20 : विमानप्रवास सामान्य नागरिकांना परवडेल यादृष्टीने एप्रिल 2016 मध्ये केंद्र शासनाने ‘उडान’ (रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीम – आरसीएस) कार्यक्रम जाहीर केला. केंद्र शासनाच्या या योजनेला संपुर्ण देशात सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाकडून प्रतिसाद देण्यात आला. त्यानुसार 151 कि.मी. अंतरापासून 800 कि.मी. पर्यंतचा विमानप्रवास सलवतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येत असून याअंतर्गत नाशिक (ओझर) येथून मुंबई व पुणे करिता तर जळगाव येथून मुंबईकरिता 23 डिसेंबर 2017 पासून विमानसेवा सुरु होणार आहे.
            ‘उडान’ योजनेसाठी राज्यातील अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड,  सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही विमानतळे आरसीएस विमानतळे म्हणून अधिसूचित केली आहेत. अधिसूचित केलेल्या विमानतळांवरुन टप्प्याटप्प्याने आरसीएस विमानसेवा सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात 128 आरसीएस विमानमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर व नांदेड विमानतळांवरुन मुंबईकरिता आणि नाशिक-पुणे हे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हैद्राबाद, कांडला व पोरबंदर या ठिकाणावरुनही महाराष्ट्रात येणारे आरसीएस विमानमार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
            प्रधानमंत्री यांनी 27 एप्रिल 2017 रोजी आरसीएस उड्डाणांचे उद्‌घाटन केले. त्यात महाराष्ट्राच्या नांदेड-हैद्राबाद या आरसीएस सेवेचा समावेश होता. ही सेवा ट्रु जेट या विमानकंपनीकडून सुरळीत सुरु आहे. आता नोव्हेंबर पासून या कंपनीकडून नांदेड-मुंबई ही विमानसेवाही सुरु करण्यात आली आहे. या विमानसेवांचा दर 1 हजार 420 रुपये  ते 3 हजार 500 रुपये या मर्यादेत विमानप्रवासाच्या अंतरानुसार निश्चित करण्यात आला आहे.
वेळापत्रक
नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर येथून सुरु होणाऱ्या आरसीएस विमानसेवा डेक्कन चार्टर्ड या विमान कंपनीने मिळविल्या असून त्यातील 23 डिसेंबर 2017 पासून सुरु होत असलेल्या विमानसेवांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहेत.
क्र.
विमानमार्ग
प्रस्थान
आगमन
वार
1
नाशिक-मुंबई
6.20
7.10
मंगळवार ते रविवार
2
मुंबई-नाशिक
14.30
17.20
मंगळवार ते रविवार
3
मुंबई-जळगाव
12.00
13.30
मंगळवार ते रविवार
4
जळगाव-मुंबई
11.15
12.45
मंगळवार, बुधवार, रविवार
5
जळगाव-मुंबई
14.30
16.00
गुरुवार, शुक्रवार, शनिवार
6
नाशिक-पुणे
18.20
19.00
मंगळवार ते रविवार
7
पुणे-नाशिक
19.20
20.00


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *