पंढरपूर Live 21 December 2017
पॅरा लिगल व्हालंटीयर्ससाठी
अर्ज करण्याचे आवाहन
पंढरपूर दि.20 :- पॅरा लिगल व्हालंटीयर्स योजनेंतर्गत पंढरपूर तालुका विधी सेवा समितीकडे पॅरा लिगल व्हालंटीयर्स म्हणून सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी दिनांक 5 जानेवारी 2018 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष पी. आर. देशमुख यांनी केले आहे.
पॅरा लिगल व्हालंटीयर्स म्हणून सेवा देण्यास इच्छुक असलेली व्यक्ती पंढरपूर तालुक्यातील रहिवाशी असावी. अर्जदारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसावा. पॅरा लिगल व्हालंटीयर्स म्हणून समितीकडून त्यांना दिलेल्या कामाबाबत काम केलेल्या दिवसात रुपये 350/- वाहतुक खर्चसहित मानधन दिले जाईल. या कामासाठी तालुक्यात रहिवाशी असलेले शिक्षक, सेवा निवृत्त शासकीय कर्मचारी, शिक्षक, वरिष्ठ नागरीक, समाजकार्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी व शिक्षक,स्वयंसेवी संस्थांचे व महामंडळाचे अराजकीय सदस्य,बचत गटातील महिला, इच्छुक साक्षर नागरीक यासाठी अर्ज करु शकतात.
पॅरा लिगल व्हालंटीयर्स पात्रतेसंबंधि आणि योजनेच्या अधिक माहितीसाठी www.nalsa.gov.inया संकेतस्थवरील services या मेनूवरील preventive & statagic legal services scheme मधील scheme for para legal volunteers येथे सविस्तर माहिती उपलब्ध आहे. तरी पंढरपूर तालुक्यातील रहिवाशी असलेल्यांनी व विधी सेवा समितीकडे पॅरा लिगल व्हालंटीयर्स म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी अर्ज तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय आवार, सांगोला रोड, पंढरपूर येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असेही न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




