👁 7 Views

युटोपियन शुगर्स चे अचूक नियोजन आट्या पाट्या स्पर्धेसाठी पोषक –डॉ.कवीश्वर.


पंढरपूर Live 21 December 2017
युटोपियन शुगर्स चे अचूक नियोजन आट्या पाट्या स्पर्धेसाठी पोषक –डॉ.कवीश्वर.
         महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळ व सोलापूर जिल्हा आट्या-पाट्या असोसिएशन व युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी.ता.मंगळवेढा,प्रायोजित ३२ वी पुरुष व २८ वी महिला सिनिअर राज्यस्तरीय आट्या पाट्या स्पर्धेचे अचूक नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन हा आट्या-पाट्या च्या भविष्यासाठी पोषक असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाचे सचिव डॉ.दीपक कवीश्वर यांनी काढले.सदर कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते.


        पुढे बोलताना कवीश्वर म्हणाले की,सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धांचे आयोजन हे युटोपियन शुगर्स ने केले असून जिल्ह्यातील या अशा प्रकारच्या पाहिल्याच स्पर्धा आहेत. या स्पर्धे करिता युटोपियन शुगर्स ने अतिशय उत्कृष्ट नियोजन करून आट्या पाट्याच्या वाढीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.याचा आदर्श समाजातील विविध संस्थांनी घेतल्यास आट्या-पाट्या या पारंपरिक खेळास वैभवाचे दिवस प्राप्त होण्यास उशीर लागणार नाही.
         सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले.या वेळी बोलताना श्रीपाटील म्हणाले की,युटोपियन शुगर्स ने आयोजित केलेले हे सामने म्हणजे कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिलेल्या शब्दाची शब्दपूर्ती आहे.सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसा निमित दरवर्षी जिल्हास्तरीय आट्या-पाट्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.चालू वर्षी युटोपियन शुगर्सच्या मैदानावरती जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन महिलांचे सामने झाले होते.त्यावेळी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी या ठिकाणी राज्य-स्तरीय सामने आयोजित करण्याचा शब्द दिला होता . त्याची आज पूर्तता झाली आहे.पारंपारिक मातीशी नाळ जोडलेला हा खेळ वाढावा या दृष्टिने युटोपियन शुगर्स नेहमीच प्रयत्नशील आहे.या स्पर्धे मध्ये २२ जिल्ह्याचे संघ सहभागी आहेत.
       सदर प्रसंगी पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक म्हणाले की,या खेळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व ५% शैक्षणिक आरक्षण मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांच्या मदतीने शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी पां.स.सा.का.चे माजी चे.दिनकर भाऊ नाईकनवरे,मोहोळ पं..स.माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर यांनी यांनी समयोचित मत व्यक्त केले सदर प्रसंगी डॉ.अशोक पाटील –सचिव आट्या पाट्या फेडरेशन ऑफ इंडिया दिलीप अप्पा घाडगे, दिलीपराव चव्हाण, राजू बापू गावडे, नामदेव जानकर, रतीलाल घाडगे,मोहन खरात, तात्या धनवडे, नाना शिंदे, दादा मोटे, बाबासो पाटील, कांतीलाल ताटे, डॉ.शरद शिर्के, पप्पू स्वामी, शिवानंद पाटील, वाडदेकर, दाजी पाटील, बाबासो देशमुख, सुरेश आगावणे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले.तर आभार मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी केले.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *