👁 10 Views

राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात सामुहिक विवाह सोहळा… !

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 26 December 2017

वधू-वरांच्या पालकांनी नावनोंदणी करावी-गौतम खटोड 
निलेश चाळक बीड: येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात दि. ४ ते १० जानेवारी या कालावधीत विद्यावाचस्पती,श्री.श्री.१००८ महामंडलेश्‍वर इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती महाराज (जळगाव) यांच्या मुखद वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे पुष्प गुंफले जाणार असून भागवत कथेत दि. ९ जानेवारी २०१८ रोजी सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. लग्नाच्या अवाजवी खर्चाला फाटा देत भागवताच्या पवित्र व्यासपीठावर आपल्या मुला-मुलीचा विवाह करण्यासाठी वधू-वरांच्या पालकांनी तात्काळ नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड आणि संयोजक राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी महाराज यांनी केले आहे.
बीड शहरातील मसरतनगर, जिजामाता चौकातील प्राचार्य शिवाजीराव भोसले अध्यात्मनगरीत’ येत्या ३१ डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०८ या कालावधीत स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचा १४ वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. सांप्रदायिक, नारदीय कीर्तनांसह यंदाच्या महोत्सवात सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा, बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत जन्मलेल्या कन्यारत्नांचा’ सामुहिक नामकरण सोहळा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, पोस्टर स्पर्धा, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला अत्याचार विरोधी प्रबोधनात्मक महारॅली यासह प्रवचन, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवात राष्ट्रसंत स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराजांची संगीतमय कथा संपन्न होणार असून प.पु.संत श्री करुणदासजी महाराज (गोवर्धन वृंदावन) यांच्या वाणीतून भक्तचरित्र’ विषयावर संगीमय कथा पार पडणार आहे.तसेच माऊंट आबु राजस्थान येथील राजयोगीनी ब.कु.उषा बहनजी या श्रीमद् भगवतगितेचे अध्यात्मिक रहस्य या विषयावर प्रवचन देणार आहेत. दि. ४ ते १० जानेवारी २०१८ या कालावधीत विद्यावाचस्पती, श्री.श्री.१००८ महामंडलेश्‍वर इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती महाराज (जळगाव) यांच्या मुखद वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे निरुपण केले जाणार आहे. महोत्सवात दि. ९ जानेवारी २०१८ रोजी सायं. ५ वाजता. सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. वधूवरांच्या पालकांनी सामुहिक विवाह सोहळ्यात मुला-मुलीचा विवाह करण्यासाठी प्रतिष्ठानकडे नाव नोंदणी करावी. नोंदणीसाठी आशिष खटोड (मो.९८२२२९९२०७) या क्रमांकावर नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *