👁 6 Views

दोन दिवसात जुन्या मोंढ्यात होणार पोलीस चौकी…आ.क्षीरसागरांची व्यापार्‍यांशी चर्चा

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 26 December 2017

निलेश चाळक बीड: शहरातील मोंढा भागात एकाच दिवशी दोन व्यापार्‍यांची दुकाने फोडल्याने या भागातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते, सोमवारी सकाळी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी डुंगरवाल आणि कांकरीया या व्यापार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी व्यापार्‍यांनी पोलीस चौकीची मागणी केल्यानंतर आ.जयदत्त क्षीरसागर यांनी बाजार समितीचा एक गाळा चौकीसाठी देण्याचे सांगून पोलीस अधिक्षकांना तात्काळ संपर्क साधला. गुरूवार दि.२७  डिसेंबर रोजी जुन्या मोंढ्यातील पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात येणार आहे यामुळे मोंढ्यातील पोलीस चौकीचा प्रश्‍न निकाली निघला आहे. 

बीड शहरातील मोंढा भागात तीन दिवसांपुर्वी एकाच रात्री दोन दुकाने अज्ञान चोरट्यांनी फोडली होती. सतीष डुंगरवाल आणि जवाहरलाल कांकरीया यांच्या दुकानांमध्ये झालेल्या चोरीनंतर व्यापार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. काल सोमवारी सकाळी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मोंढा भागात भेट देऊन व्यापार्‍यांशी चर्चा केली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या भागामध्ये पोलीस चौकीची मागणी व्यापार्‍यांनी केल्यानंतर आ.क्षीरसागर यांनी बाजार समितीच्या ताब्यातील एक गाळा चौकीसाठी देण्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांच्याशी चर्चा करून चौकीचा प्रश्‍न मार्गी लावला. गुरूवार दि.27 डिसेंबर रोजी पोलीस चौकीचे उद्घाटन होणार असून आ.क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे मोंढ्यातील पोलीस चौकीचा प्रश्‍न मार्गी लागल्यामुळे व्यापार्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, दूध संघाचे चेअरमन विलास बडगे, अमृत सारडा, जि.प.सदस्य गणपत डोईफोडे, रंजितसिंह चव्हाण, रंजित बनसोडे, डुंगरवाल, कांकरीया, पी.आय. बडे यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *