पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018
आदिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव यांची भारतीय जनता पार्टीच्या आदीवासी आघाडीच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी निवड करण्यात आली असून आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हरिश्चंद्र भोये व संघटन महामंत्री कृष्णाराव चव्हाण व भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अविनाश कोळी यांच्याहस्ते मुंबई मंत्रालय येथे नुकतेच प्रदान करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासीसाठींच्या विकास योजनांची माहिती पाड्यापाड्या पर्यन्त पोहचावावी गरज पडली तर ह्या विकास योजनांची माहिती ठीकठिकाणी आदिवासी योजनांची माहिती देणारे अभ्यास वर्ग व मेळावे भाजपा आदिवासी आघाडीच्या माध्यमातून आयोजित करावे व अभ्यास वर्गातून केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनांची माहिती शेवटच्या घटका पर्यन्त पोहचावावी या हेतून भाजपाच्या वतीने आदिवासी आघाडीच्या माध्यामातून प्रयत्न केले जातात.या आघाडीच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी पंढरपूर येथील कोळी महादेव जमातीचे नागेश अधटराव यांची निवड करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
हे पत्र प्रदान करताना गणेश सुर्यंवशी,परभणीचे जिल्हाध्यक्ष मारुती पडाईत,अशोक वाघ,ऍड.ओमगशद,बोईणवार,अमोल कोळी,संजय मुळे,धिरज परचंडराव,नितिन पानकर,महेश जवंजाळ,नितिन पवार आदी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com



