👁 8 Views

पंढरपूर पत्रकार संघाच्या सचिवपदी पुन:श्‍च भगवान वानखेडे यांची निवड अध्यक्षपदी प्रविण नागणे तर कार्याध्यक्षपदी विकास पवार

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018
भगवान वानखेडे व प्रविण नागणे यांचा सत्कार 
पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष सचिन कांबळे यांनी केला.

निवडीनंतर नुतन अध्यक्ष व सर्व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार मावळते अध्यक्ष सचिन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे, सदस्य संजय रणदिवे, माऊली डांगे, कुमार कोरे, बाहुबली जैन, महेश कदम, राजु बाबर आदी उपस्थित होते.    

पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाच्या सचिवपदी पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांची पुन:श्‍च निवड करण्यात आली. नुतन अध्यक्षपदी प्रविण नागणे व नुतन कार्याध्यक्षपदी विकास पवार यांची निवड करण्यात आली.

येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली. यावेळी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नुतन कार्यकारिणीमध्ये सचिवपदी भगवान वानखेडे, उपाध्यक्षपदी राजेंद्र कोरके-पाटील, दिनेश खंडेलवाल, सहसचिवपदी रविंद्र लव्हेकर, खजिनदारपदी जाकीर नदाफ, सहखजिनदारपदी नितीन शिंदे तर प्रसिध्दीप्रमुखपदी संजय कोकरे यांची निवड करण्यात आली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *