👁 6 Views

प्रेमभंगाच्या नैराश्येतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


पंढरपूर LIVE 30 Jun 2018
पुणे – पुण्यातल्या अमनोरा परिसरात प्रेमभंगाच्या नैराश्येतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय अखिलेश्वर कुमार (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे. अक्षय मगरपट्टा परिसरातल्या आयबीएस संस्थेत मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. तो मूळचा आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील आहे.

प्रेमात निराशा आल्याने गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी अक्षयने राहत असलेल्या खोलीत फॅनला दोरी बांधून गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुमारे १५ पानी सुसाईड नोट लिहिली आहे. या पत्रात त्याने त्याच्या प्रेमाबाबतची सर्व कहाणी लिहली आहे. मात्र, प्रेमभंग का झाला याबाबत काही लिहलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 


या पत्रात त्याने आई, वडील आणि भावाची माफी मागितली आहे. मी मुलाचे कर्तव्य निभावू शकलो नाही असेही त्याने पालकांना उद्देशून लिहिले आहे. मित्रांचीही त्याने माफी मागितली आहे. अक्षय अमनोरा परिसरात भाड्याने राहत होता. महाविद्यालयातील मुलीशीच त्याचे प्रेम होते. मात्र प्रेमभंग झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून तो महाविद्यालयात जात नव्हता. गुरुवारी तो महाविद्यालयात गेला नसल्याने त्याचे मित्र त्याला फोन करत होते. मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याचे मित्र त्याला रूमवर भेटण्यासाठी गेले त्यावेळी हा आत्महत्येचा प्रकार उघड झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अक्षयने लिहिलेली सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *