👁 9 Views

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील तरूणाची आत्महत्या… मराठा समाजाचा संताप

पंढरपूर LIVE 30 July 2018


मराठा आरक्षण मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने सुरू आहेत. तर, काही युवकानी आपला जीव देखील दिला आहे. हे सत्र काही केल्या थांबेनासे झाले आहे. काल रविवारी मराठवाडा येथील दाभड येथे एकाने गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. कचरू दिगंबर कल्याणे (वय-४२) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकरी  व परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी पंचनाम्यासाठी आलेल्या क्युआरटी पथकासमोर मराठा समाजाने संताप व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील पिंपळगांव येथील प्रल्हाद कल्याणकर गुरुजी यांनी शुक्रवार दि २७ रोजी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे या तरूणाने गळफास घेत आपले जीवन संपवले. कल्याणे उच्चशिक्षित असून ते मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन दिवसापासून मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावू, आता ‘करो या मरो’ लढाई करावी लागेल, मी ही पिंपळगांव प्रमाणेच करू काय की?, अशी चर्चा कल्याणे करत होते. 
काल रविवारी घरातील सर्व जण बाहेर गेल्यानंतर खिशात चिठ्ठी लिहून ‘एक मराठा- लाख मराठा’ मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून त्याने छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई बाहेरुन घरी आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता गावकरी  व परिसरातील मराठा बांधव घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. जमावाने आणि नातेवाईकांनी पोलिसांना पंचनामा करत असताना रोखून धरले. शेवटी तहसिलदार अरविंद नरसीकर यांनी घटनास्थळी भेट देत कल्याणे कुंटुबास जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच सदरील प्रस्ताव तातडीने मुख्यमंत्री यांना सादर करण्याचे आश्वासन दिल्याने ही परिस्थिती निव्वळली. तर कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव यांनी दहा हजार रूपयांची रोख मदत जाहिर केली व एका मुलीला शिक्षणासाठी व पालकत्व म्हणून दत्तक घेतले. 
समाजाचा संताप अन क्यूआरटी पथक माघारी
पंचनामा होऊ न देण्यासाठी गावकरी व मराठा समाज बांधव संतप्त झाले होते.  पोलिसांनी खबरदारी म्हणून क्यूआरटी पथकाला पाचारण केले. यामुळे जमाव अधिकच संतप्त झाला. पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी क्यूआरटी पथक बोलावून भीती घालत असल्याचा आरोप करत समस्त नागरिक संतापले होते. यावेळी क्यूआरटी पथकाने गावातून माघार घेतली.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *