👁 8 Views

कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या बळीराजाला सावरण्याकडं सरकारचे दुर्लक्ष… स्वतःचे सरण रचून शेतकऱ्यानं दिली प्राणाची आहुती…

पंढरपूर LIVE 30 July 2018

बुलडाणा – कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने स्वत: ची चिता रचून स्वत:लाच पेटवून घेत आपल्या प्राणाची आहुती दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात विष घेत स्वत:ला सरणावर जाळून घेतल्याच्या या खळबळजनक घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या बळीराजाला सावरण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याची भावना महाराष्ट्रातील जनसामान्यातून उमटत आहे.

गजानन अर्जून जायभाये (३५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे ३ एकर शेती होती. पण, कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मृत शेतकरी हा पत्नी आणि ५ वर्षाच्या मुलासह राहत होता.

गजानन याच्यावर महाराष्ट्र बँकेचे ७० हजार रुपयांचे पीककर्ज होते. त्यातच कर्जमाफीच्या गोंधळामुळे पुन्हा त्याला कर्ज मिळू शकले नाही. त्यामुळे उधार-उसनवार करून करून त्याने बी-बियाणे, खत घेऊन पेरणी केली होती. त्यातच सततची नापिकी, पावसाची ओढ आणि कर्जबाजारीपणामुळे घरप्रपंच चालवणे त्याला अवघड होऊन बसले होते. त्यामुळे तो खूप तणावाखाली गेला होता. यातूनच त्याने आत्महत्या केली, अशी माहिती ज्ञानदेव कारभारी जायभाये यांनी पोलीस ठाण्यात दिली. 
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *