👁 6 Views

(समस्या पंढरीच्या भाग-1) शाॅपींग सेंटर मागील बाजुस घाणीचे साम्राज्य… पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

पंढरपूर LIVE 8 ऑक्टोबर 2018

(समस्या पंढरीच्या भाग-1) 

पंढरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकानजीकच्या इंद्रप्रस्थ शाॅपींग सेंटरच्या मागील बाजुस सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी वरील बाजुने ड्रेनेजचे गळणारे घाण पाणी थेट मागील बाजुच्या शाॅपींग सेंटर समोर पडते.

हे घाण पाणी येथील मुख्य रस्त्यावर साठुन राहिल्याने या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलीय. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जेथे पाणी साठलेय त्याला लागुनच एक काॅम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. महाराजा बेकरी व सद्गुरु स्वीटस ही प्रसिद्ध बेकरी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फर्मही नजदीकच आहेत . या फर्ममधील खाद्यपदार्थ येथूनच नेले जातात. इंद्रप्रस्थ च्या वरच्या मजल्यावर काही हाॅस्पिटलस आहेत येथे रूग्ण घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्स ही या घाणीच्या मार्गावरच थांबवाव्या लागतात.

एकुणच येथे येणारे विद्यार्थी, नागरिक, रूग्ण आदी सर्वांनाच येथे पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या प्रश्नाकडे नगरपरिषदेच्या संबंधित प्रशासकीय विभागाचे दुर्लक्ष असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न ‘जैसे थे’ प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी यासंबंधी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेकडे तक्रार ही केली होती. परंतु नगरपरिषदेच्या काही कर्मचाऱ्यांनी येथील पहाणी करण्याव्यतिरिक्त अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे समजते.

पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी स्वतः या प्रश्नाकडे लक्ष देऊन तो सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी होत आहे.
*खालील ठिकाणाहून वरील ड्रेनेजचे घाण पाणी गळते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *