👁 6 Views

*वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करा -खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आवाहन * डॉल्बी ध्वनिव्यवस्था वापरू नये *सोलापूर -तुळजापूर दरम्यानच्या वाहतूक मार्गात बदल *भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन *विद्यार्थ्यांना मदत करण्याचे गणेश मंडळाना आवाहन

पंढरपूर LIVE 10 ऑक्टोबर 2018

                सोलापूर दि. 9 :- रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची प्रभावी जनजागृती करावी. अपघात होऊ नये  म्हणून अपघाताच्या ठिकाणी अंशकालीन व दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज दिल्या.       
                जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक शासकीय विश्रामगृहातील सभागृहात झाली. बैठकीस आमदार गणपतराव देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,  राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता ए.एल. भोसले, अधिक्षक अभियंता संतोष शेलार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्यासह समितीचे सदस्य, वरिष्ठ पोलीस अधिकारी व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
               जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि जिल्हा मार्गावरील ब्लॅक स्पॉट ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून   आवश्यक उपाय योजना कराव्यात. रस्त्याच्या कडेची  काटेरी झुडपे तात्काळ काढावीत, वळणाच्या ठिकाणी साईन बोर्ड लावावेत.   ब्लॅक स्पॉट ठिकाणी  समिती  सदस्य व तज्ञामार्फत पाहणी करावी, मोहेाळ पंढरपूर रस्त्यावरील पेनूर येथे वळणाच्या ठिकाणी गतीरोधक लावण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या .
वाहन चालवताना मोबाईल वरून बोलणे, मद्यपान करून गाडी चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, उलट्या दिशेने   वाहन चालवणाऱ्यावर कडक कारवाई करावी. साखर कारखाना सुरू होत असून  ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यासाठी आणि क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये यासंदर्भात साखर कारखान्याना सूचना द्याव्यात, असेही बैठकीत सांगण्यात आले.

  


डॉल्बी ध्वनिव्यवस्था
वापरू नये
सोलापूर  दि. 9 :- जिल्ह्यात 10 ते 18 ऑक्टोबर 2018 कालावधीत नवरात्रौ उत्सव साजरा होत उत्सव काळात जिल्ह्यातील जनतेला ध्वनीप्रदुषणाचा त्रास होऊ नये म्हणून अप्पर जिल्हा दंडाधिकारी  संजय तेली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये आदेश जारी केले आहेत.
10 ते 18 ऑक्टोबर कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील ( पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) डॉल्बी मालक, धारक, उत्सव मंडळानी त्यांच्या  ताब्यातील  डॉल्बी सिस्टिम वापरात, उपयोगात आणू नये. या कालावधीत डॉल्बी मशीन व यंत्र सामग्री शीलबंद करून ठेवावी,असे आदेशात नमुद केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, मंडळे, पदाधिकारी यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी  तेली यांनी कळविले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

  • सोलापूर -तुळजापूर दरम्यानच्या
    वाहतूक मार्गात बदल
    सोलापूर  दि. 9 :- नवरात्र उत्सवानिमित्त सोलापूर शहरातून तुळजापूर कडे आणि तुळजापूर कडून सोलापूरकडे येणाऱ्या वाहनाच्या वाहतूक मार्गात अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी बदल केले आहेत.  
    हे बदल महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) नूसार केले असून सेालापूर शहराकडे तुळजापूरहून येणारी वाहतुक तुळजापूर इटफळ बोरामणी सोलापूर या पर्यायी मार्गाने जातील सोलापूरहून तुळजापूरकडे जाणारी वाहतुक ही सोलापूर बोरामणी इटफळ तुळजापूर या पर्यायी मार्गाने जातील. हे आदेश दि 8.10.2018 ते 10.10.2018 आणि दिनांक 20 ते 24 ऑक्टोबर 2018 या कालावधीसाठी लागू राहतील.
    00000
    भाडेकरूंची माहिती
    देण्याचे आवाहन
              सोलापूर  दि. 9 :- जिल्ह्यात नव्याने भाड्याने राहवयास येणाऱ्या व्यक्तीमुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये, भविष्यात होणाऱ्या दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा यासाठी नवीन राहण्यासाठी येणारे व्यक्ती यांची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे गरजचे आहे.म्हणून घरमालक, प्रॉपर्टी डिलर / ब्रोकर / एजंन्ट जुने वाहन विक्री – खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांनी जिल्ह्यात  नव्याने भाड्याने राहण्यास येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी, असे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिले आहेत.
                हे आदेश दिनांक 3 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर  2018 कालावधीत सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्व नगरपालिका हद्दीत लागू असल्याचे  अपर जिल्हादंडाधिकार तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.
    00000
    विद्यार्थ्यांना मदत करण्याचे
    गणेश मंडळाना आवाहन
    सोलापूर दि. 9 :- जिल्हयातील गणेश मंडळाकडे वर्गणीच्या स्वरूपात निधी गोळा  होत असतो. सामाजिक उत्तरदायीत्व पार पाडण्यासाठी मंडळांनी या निधीचा विनियोग होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील गणेश उत्सव मंडळाने किमान एक तरी गरजू विद्यार्थ्यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त स्मिाता माने यांनी केले आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *