पंढरपूर LIVE 14 ऑक्टोबर 2018
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे ३६ वर्षीय इसमाचा स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने मृत्यू झाला. अकलूज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बिटू ऊर्फ महेश हणमंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपासून बिटू चव्हाण यांना तापाची लागण झाल्याने त्यांना अकलूज येथील दवाखान्यात दाखल केले होते. त्यावेळी त्यांना न्युमोनिया सहीत घशात, फुप्फुसांत संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यांना स्वाईन फ्लू सदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने त्यांच्या रक्तांचा रिपोर्ट प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. तीन दिवसानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईल, असे क्रिटीकेअर हॉस्पिटलचे डॉ. बंडगर यांनी सांगितले.
शनिवारी रात्री ८ वाजता चव्हाण यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुस्ते परिसरात डेंग्यू आजाराचे थैमान सुरू आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थ विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच चव्हाण यांच्या मृत्युमुळे सुस्ते गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वाईन फ्लू बाधीत कुटुंबातील किंवा शेजारच्या व्यक्तीची तपासणी केली जाईल. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे ही स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे आहेत. तर बाधीत कुटुंबाच्या शेजा-यांना ही लक्षणे दिसून येत असतील तर त्याकडे लक्ष देण्यासाठी टीम तैनात करणार आहोत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
स्वाईन फ्लू बाधीत कुटुंबातील किंवा शेजारच्या व्यक्तीची तपासणी केली जाईल. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे ही स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे आहेत. तर बाधीत कुटुंबाच्या शेजा-यांना ही लक्षणे दिसून येत असतील तर त्याकडे लक्ष देण्यासाठी टीम तैनात करणार आहोत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







