👁 6 Views

कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती

पंढरपूर LIVE 13 ऑक्टोबर 2018


मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या सचिव तथा मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांना नियुक्ती पत्र अध्यक्ष मुकुंद जाधवर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाची राज्य स्थरीय बैठक पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे नुकतीच झाली असून दरम्यान या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला असे सांगून अध्यक्ष जाधवर म्हणाले की, मंत्रालयीन स्थरावरील संघटनेचे काम अधिक सुलभ व्हावे आणि राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या हक्काच्या मागण्यांना न्याय मिळावा म्हणून सदर नियुक्ती करण्यात येत आहे असे स्पष्ट केले. दरम्यान मुलाणी म्हणाले की, राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व शासकीय व निमशासकीय विविध विभागात आस्थापनेवर व कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. अशा सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असून मंत्रालयीन पातळीवर सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताचे शासन निर्णय, परिपत्रक, शासन आदेश आदी साठी मंत्रांकडे सतत पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करणे असे सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगितले. तसेच मंत्रालयातील अनेक विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागांवर कंत्राटी कर्मचारी काम करत असून त्यांच्या कामाचा समान काम, समान वेतन असा मोबदला मिळत नाही, एकीकडे कंत्राटे घेणाऱ्या खाजगी संस्था आणि दुसरीकडे सरकारकडून  या कंत्राटी कर्मचारी घोर फसवणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे मुलाणी यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्ष मुकुंद जाधवर, कोषाध्यक्ष विकास डेकाडे, उपाध्यक्ष प्रमोद अहिरराव, जिल्हा परिषद आरोग्य संघटना अध्यक्ष अरुण खरमाटे, राष्ट्रीय किसान क्रांती महासंघ समन्वयक संदिप गिड्डे सह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *