पंढरपूर LIVE 16 ऑक्टोबर 2018
पंढरपूर (प्रमोद बनसोडे) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील कुमारी सारिका सिताराम महारनवर या विद्यार्थीनीची सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
जुन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिक्षेत पंढरपूर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या अनवली (ता. पंढरपूर) येथील सारिका सिताराम महारनवर या विद्यार्थीनीची सिंहगड महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाचा सार्वजनिक बांधकाम विभाग (पी डब्ल्यू डी ) मध्ये कनिष्ठ अभियंता पदी निवड झाली आहे.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दिलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे. या महाविद्यालयात कुशल, अनुभव व तज्ञ प्राध्यापक तसेच १५ प्राध्यापक पी.एच.डी. धारक असुन ४० हुन अधिक प्राध्यापक अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गाजलेल्या विदयापीठातुन पीएचडी करीत आहे. त्यांच्या या पीएचडी चा फायदा सिंहगड मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान,राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण पंढरपुर सिंहगड मध्ये दिले जात आहे म्हणूनच या उत्कृष्ट शिक्षण पध्दती मुळे आज पंढरपुर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळवीत आहेत. सिंहगड मधील प्राध्यपकांच्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश प्राप्त करू शकले. माझ्या यशामागे माझा भाऊ व आई-वडील यांच्या आशीर्वादामुळेच मी हे यश प्राप्त केले असल्याचे सारिका महारनवर हिने बोलताना सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झाल्याबद्दल सारिका सिताराम महारनवर यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे,सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. चेतन पिसे, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. यशवंत पवार, प्रा. संगमनाथ उप्पीन सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







