👁 11 Views

एस.टी.ने हंगामी दरवाढ करु नये-अशोक कामटे संघटना

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018

सांगोला/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळ प्रवासी गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करणार असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे. ही भाडेवाढ न करता सद्यपरिस्थितीत असणारे प्रवासभाडे आकारावेत. अशा मागणीचे पत्र शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने सेालापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे. 

    महामंडळाने मागील वर्षापासून हंगामी प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेतल्याने उन्हाळी, दिवाळी, हंगामात सर्वसामान्य प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास राज्यभरात करतात. यापुर्वीच दोन महिने अगोदर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक झळ बसत आहे. त्यात 1 नोव्हेंबर 2018 पासून प्रवासी हंगामी दरवाढ करणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशात तीव्र नाराजी आहे. तरी प्रशासनाने हंगामी प्रवासी भाडेवाढ करु नये. दर पूर्ववत ठेवावेत अशी मागणी प्रवासी वर्गाच्या वतीने शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती अध्यक्ष दिवाकत रावते महाराष्ट्र परिवहन मार्ग महामंडळ मुंबई, राज्य व्यवस्थापक मुंबई यांनाही पाठविण्यात आल्याचे अध्यक्ष संदीप बनकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *