👁 8 Views

जल संवर्धनाचा मळेगाव पॅटर्न

पंढरपूर LIVE 3 नोव्हेंबर 2018

            सोलापूर दि :- समाधानकारक पाऊस झाला नाही तरीही मी यंदाच्या खरीपात कांदा आणि सोयाबीनचे पीक घेऊ शकतो. माझ्या विहीरीला आज पाणी आहे. हे पाणी जलयुक्त शिवार अभियानातील कामामुळे आहे. या पाण्यावरच मी आता खरीप शेतीला सिंचनाची व्यवस्था करु शकतो….. बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील शेतकरी संतोष निंबाळकर सांगत हेाते.
           

श्री. निंबाळकर यांची ही प्रतिक्रीया प्रातिनिधीक आहे. मळेगाव मधील सर्वच ग्रामस्थांनी गेली तीन चार वर्षे जलयुक्त शिवार  अभियानातील अनेक कामांत सहभाग घेतला, श्रमदान केले. या अभियानातून झालेल्या कामांमुळे गावातील शिवारात गेल्या तीन वर्षापासून पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्यात आला. आज तेच पाणी  खरीपाच्या पिकाचा आधार बनत असल्याचे मळेगावकरांशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाले.
            मळेगावात जलयुक्त शिवार अभियानातील कामे होण्यापुर्वी ग्रामस्थांना विहीर अधिग्रहण कराव्या लागत असे अथवा टँकरवर अवलंबून राहावे लागत असे, पण आता जलयुक्त शिवार अभियानातील कामामुळे साठवण क्षमता निर्माण झाली. आणि गावात अनेक बदल झाले, असे मळेगावचे सरपंच गुणवंत  मुंढे यांनी सांगितले.
            जलयुक्त शिवार  अभियानातील कामांबरोबर  गावातील अनेक शेतकऱ्यांनी  शेततळे उभारली. या शेततळ्यातही पाणीसाठा झाला. यामुळे पीक पध्दतीत बदल झाला. शेतकरी ऊस पिकांकडुन द्राक्ष, लिंबू, कांदा आणि सोयाबीनच्या पिकांकडे वळले आहेत. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाणी वापरातही कपात झाली, असे सरपंच गुणवंत मुंढे यांनी सांगितले.
            

जलयुक्त अभियानातील कामांत ग्रामस्थांनी वेळ दिला, श्रमदान केले, निधी दिला आणि आपापल्या परीने  वाटा उचलला. ओढा खेालीकरण  आणि  सरळीकरणाच्या कामामुळे  विहीर आणि बोअरवेलच्या पाण्यात वाढ झाली आहे. यामुळे गावातील पीक पध्दतीत बदल झाला आहे, असे श्री. शिवाजी पवार यांनी सांगितले.
            पुर्वी चार एकर शेतीला पाणी देऊ शकत होतो. आता विहीरीला असलेल्या पाण्यामुळे माझी सोळा एकर जमीन शाश्वत सिंचनाखाली आली आहे, असे श्री. विशाल बाबुराव बाबर यांनी सांगितले.
            श्री. संतोष लक्ष्मण गडशिंग यांनी शेततळे उभारले आहे. या शेततळयात विहीर आणि बोअरमधील पाणी घेऊन या पाण्यावर लिंबूचे पीक घेतले आहे. शेडनेट उभारुन शिमला मिरचीचे पीक घेतले आहे. शेततळ्यातील पाण्यामुळे मी बागायती शेती करू शकतो, असे श्री. गडशिंग यांनी सांगितले.
            माजी सरपंच नागनाथ म्हमाणे यांनी गावातील लोकांनी एकत्र येऊन केलेल्या कष्टामुळे पाणी टंचाईशी सामना करणे आता शक्य झाल्याचे सांगितले. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *