👁 9 Views

ऊसाची ट्राॅली पलटी झाल्याने घडलेल्या अपघातात मंगळवेढा तालुक्यातील महिलेचा जागीच मृत्यू

पंढरपूर LIVE 14 नोव्हेंबर 2018


 ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राॅली पलटी होऊन घडलेल्या अपघातात मंगळवेढा तालुक्यातील एका महिलेनं आपला जीव गमवला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या महिलेच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भैरवनाथ शुगर लवंगी या साखर कारखान्याकडे गाळपासाठी जाणारी उसाने भरलेली ट्रॅक्‍टर ट्रॉली पलटी होऊन हा अपघात घडला. यावेळी ट्रॉली खाली सापडून सदर महिला जागीच ठार झाली. लक्ष्‍मी राम कदम (वय ४१) असे सलगरे बु. येथील मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील वळणावर लवंगीच्या भैरवनाथ साखर कारखानाकडे गाळपासाठी ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर (MH 45  6757) पलटी झाला. यावेळी लक्ष्‍मी कदम या जळण घेऊन घरी जात होत्या. त्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
रस्त्याच्या बाजुला जळण घेवून घरी जाताना उसाच्या ट्रॉली खाली सापडून  जागीच मयत झाली या घटनेनंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले असून यामध्ये दोषी असणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *