पंढरपूर LIVE 22 नोव्हेंबर 2018
पंढरपूर:
“सोलापूर जिल्ह्यातील दोन शाळा बेकायदेशीर रित्या एकमेकांना जोडून मासिक पगाराच्या 3%रक्कम वर्गणी द्या अन्यथा बदली करतो” अशी शिक्षकांना धमकी देणाऱ्या संस्थाचे बेकायदेशीर हस्तांतरण माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री आर डी जोशी यांनी रद्द केले.यामुळे शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या शिक्षण सम्राटांना धक्का बसला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था सुपली या संस्थेचे हनुमान विद्यालय सुपली ही शाळा माणदेश एज्युकेशन सोसायटी अजनाळेला अनधिकृत रित्या जोडून मुख्याध्यापक यांच्या सह काही शिक्षकांची बदली करण्यात आली होती.यासाठी शिक्षक कर्मचारी यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन शाळा परस्पर विकण्याचा पराक्रम हनुमान विद्यालयाच्या मुख्याध्यापकानी केला होता.सदर बदली व हस्तांतरण प्रक्रियेत शासन मान्यता नसताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची लेखी स्वरूपात तक्रार शाळेतील शिक्षक विलास पाटील यांनी माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली त्या अनुषंगाने मंत्रालयातील शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन सदर घटनेची चौकशी आदेश उपसंचालक पुणे ,शिक्षण अधिकारी सोलापूर यांना दिले.संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता हे हस्तांतरण अनियमित असल्याचे निदर्शनास आले.यावर तातडीने कारवाई करून ते रद्द ठरविण्याचे आदेश उपसंचालक पुणे यांनी शिक्षण अधिकारी सोलापूर यांना दिले.संदर्भ शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांचेकडील जा.क्र.शिक्षण उ.प./301/पु वि /अनियमित/हस्तांतरण/2018/8046/दि.2/11/18
नुसार दोन्ही संस्था चे अध्यक्ष व शाळांचे मुख्याध्यापक यांना लेखी पत्राद्वारे हस्तांतरण रद्द करून बदली झालेल्या शिक्षकांना मूळ आस्थापनेवर दिनांक 19 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.
त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण सम्राटांना त्यांच्या मनमानी कारभाराला चपराक बसली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








