👁 13 Views

यशवंत सेनेच्या सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी काशिलिंग कोळेकर

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- यशवंत सेनेच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील नेपतगावचे काशिलिंग कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. आज दि. 03 डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष माधव(भाऊ) गडदे यांच्या आदेशानुसार यशवंत सैनिकांच्या कांही नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी श्री. कोळेकर यांना युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र यशवंत सेनेचे सोलापूर जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सागर मासाळ यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

    काशिलिंग कोळेकर हे पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध समाजकार्यात हिरिरीने सहभागी होणारे युवा वर्गातील लोकप्रिय समाजसेवक आहेत. ग्रामीण भागातील युवकांच्या सर्वांगीन विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सोलापूर जिल्ह्यातील युवा वर्गाशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती यावेळी सागर मासाळ यांनी दिली.

यशवंत सेनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदाची धुरा माझ्या खांद्यावर पडल्याने माझी जबाबदारी आणखी वाढलेली असून सोलापूर जिल्ह्यातील समाजाच्या युवकांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण व आवश्यक त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व यशवंत सेनेचे जिल्ह्यातील संगठन मजबुत होण्यासाठी तसेच धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु. असे अभिवचन यावेळी काशिलिंग कोळेकर यांनी दिले.



यावेळी  सतीश सरगर (पंढरपुर तालुका प्रमुख), आनंदराव मेटकरी (सांगोला तालुका प्रमुख), पै.किसन खरात (मार्गदर्शक यशवंतसेना), भगवान पळसे, मुन्ना मासाळ(युवानेते), प्रमोद सरगर, सुर्यकांत कोळेकर, विकास वगरे, भारत शेजाळ, मायाप्पा हेगडकर, धनाजी सरगर, प्रकाश येडगे, समाधान सरगर, अजय सरगर, संदिप येडगे, विजय येडगे, विजय ठोंबरे, लिंगा येडगे, पांडुरंग सरगर, अक्षय गवळी, बालाजी सरगर, सिध्देश्वर सरगर, सज्जन येडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *