पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018
स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६२ वा महापरिनिर्वाण दिन साजरा
पंढरपूरः- ‘सत्तेवर असताना पंडित नेहरूंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोलावून महत्वपूर्ण जबाबदारी दिली. त्यांनी उत्कृष्ठपणे पार पाडताना महिलांविषयीचे धोरण आणि मते मांडली. पुढे हेच धोरण आणि मते विश्वाने स्विकारली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्ववंद्य आहेत. डॉ. आंबेडकर यांच्याकडे कोणी वाचक गरजेची पुस्तके अथवा वाचन संदर्भाबाबत गेले असता ते संदर्भासह सखोल माहिती देत असत. कारण जगात प्रसिद्ध होणारे प्रत्येक पुस्तकाचे ते वाचन करायचे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६२ वा महापरिनिर्वाण दिन साजरा झाला. यावेळी स्वेरीचे जेष्ठ विश्वस्थ दादासाहेब रोंगे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण सांगत होते. ते पुढे म्हणाले. ‘जेष्ठ साहित्यिक प्र..के. अत्रे यांच्याकडे एक वाचक गेले होते. त्यांनी एका पुस्तकाची मागणी केली. ते पुस्तक अत्रे यांच्याकडे नव्हते तेव्हा अत्रे म्हणाले ‘ तुम्ही इतरत्र कुठेही न जाता तुम्हाला हे पुस्तक डॉ. आंबेडकर यांच्याकडेच मिळेल.’ असे खात्रीशीर सांगितले. त्यावर वाच्कालादेखील ते पुस्तक डॉ. आंबेडकर यांच्याकडून प्राप्त झाले. एवढेच नव्हे तर कमी वेळात पुस्तकातील संदर्भ सांगून पुस्तके देत असत. एकूणच जगातील कोणत्याही माणसाने एवढे वाचन केले नसेल इतके वाचन डॉ. आंबेडकर यांनी केळे आहे.’ यामुळे ते विश्ववंद्य आहेत. असे सांगून अनेक महत्वपूर्ण घटना सांगितल्या.
यावेळी संस्थेचे विश्वस्त एच.एम.बागल, डॉ. विश्वास मोरे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. सचिन गवळी, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा व्ही.डी. जाधव, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रा.बी.डी.गायकवाड, प्रा. एस.एम. बागल, प्रा. डी. ए. तंबोली, प्रा. मोहिते, प्रा.व्ही.एस. क्षीरसागर, अमोल चंदनशिवे, सागर गायकवाड यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com