पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018
पंढरपूर :- चंद्रभागा नदी स्वच्छतेबरोबरच पंढरपूरात येणाऱ्या भाविकांसाठी पर्यावरण विभागामार्फत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
नमामी चंद्रभागातंर्गत पर्यावरण विभागामार्फत पंढरपूरात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत बैठकीत पर्यावरण मंत्री कदम बोलत होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रादेशिक उपसंचालक प्रशांत खांडकेकर, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, तहसिलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, पंढरीत येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पर्यावरण विभागामार्फत 16 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून भाविकांसाठी, शौचालये, महिलांसाठी चेजिंग रुम, स्नानासाठी ओठे, विधिवत पुजेसाठी व्यवस्था तसेच आवश्यक ठिकाणी घाट बांधणी, परिसरात वृक्ष लागवड, स्वच्छ पिण्याचे पाणी, निर्माल्य व कचरा व्यवस्थापन आदी कामे प्राधान्याने करावीत. असा सुचना श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.
तत्पुर्वी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्यावतीने अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हस्ते मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नारायण पाटील, आमदार तानाजी सावंत, मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com