👁 9 Views

तळेगाव येथील पै.मुरलीधर मुंडे यांना राज्यस्तरीय “क्रीडारत्न” पुरस्कार जाहीर

पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018

25 डिसेंबर रोजी पुरस्कराचे परभणीत वितरण
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परभणी व शिक्षण परिषद व पुरस्कार प्रदान सोहळा समितीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “क्रीडारत्न” पुरस्कार जाहीर झाला. समितीचे आयोजक प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी या पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे.  त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत  आहे.

    सविस्तर वृत्त असे की, जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक , श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळेचे संस्थापक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा श्री.तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे संस्थापक पैहलवान मुरलीधर भागवतराव मुंडे यांनी व्यायाम शाळेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून तसेच क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. यापूर्वी ही त्यांनी केलेल्या कुस्ती व क्रीडा क्षेत्रातील कार्यामुळे याआधी बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहेत. सामाजीक, शैक्षणिक, दुग्धव्यवसाय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने यावर्षीचा सन 2018 साठीचा राज्यस्तरीय “क्रीडारत्न”  पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला. 

श्रीकृष्ण गार्डन, वसमत रोड, परभणी येथे मंगळवार,दि.25 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटक महापौर सौ. मिनाताई सुरेशराव वरपुडकर तर अध्यक्षस्थानी संयोजक आम आदमी महाराष्ट्र ब्रिगेडीयर सुधीर सावंत, मार्गदर्शक जि.प., शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विठ्ठल भुसारे, मुख्य अतिथी कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव, मार्गदर्शक मानव सेवा चँरिटेबल ट्रस्ट पुणे संस्थापक अध्यक्ष डॉ.भारत नांदुरे, आयोजक महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अँड. छत्रगुण नांदुरे, प्रदेश मार्गदर्शक ह.भ.प.बंडू महाराज ढाकणे, प्रदेश संघटक जावेद हरवळकर, जिल्हाध्यक्ष (प्राथमिक) बाबासाहेब कराड, जिल्हाध्यक्ष (प्राध्यापक) प्रा.गोविंद लहाने, जिल्हाध्यक्ष (मा.) पांडुरंग जाधव, जिल्हाध्यक्ष (खा.प्रा.) सुधाकर कांबळे, जिल्हाध्यक्ष (मेस्टो) अमोल धाडवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.  सदरील पुरस्काराचे  विशेष समारंभात वितरण करण्यात येणार आहे.  स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र , शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी मुंडे म्हणाले की, मिळालेला पुरस्कार माझी सामाजीक जबाबदारी व काम करण्याची नैतिक जबाबदारी वाढवीत आहे तसेच ते माझा उत्साह वाढवीत मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत असल्याचे मत त्यांनी. आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्द श्री.मुंडे यांचे शैक्षणीक, सामाजिक, राजकीय क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *