पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018
सोलापूर विद्यापीठाच्यावतीने प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अविष्कार’ या संशोधन महोत्सवाच्या ‘अविष्कार २०१८’ चे संयोजकत्व गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजला मिळाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली. हा संशोधन महोत्सव २३ आणि २४ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. 

येत्या २३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. संशोधन महोत्सवाचे उदघाटन ट्रान्सपॉवर प्रा. ली.चे उपाध्यक्ष डॉ.शिवाजी पडवळ यांच्या हस्ते होणार असून सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस ह्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला सोलापूर विद्यापीठाकडून समन्वयक डॉ. एस.डी.राऊत, संशोधन विभागाचे विशेष अधिकारी डॉ. व्ही.बी.पाटील तसेच स्वेरीचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा हे ही उपस्थित राहणार आहेत. ‘अविष्कार २०१८’ या संशोधन महोत्सवामध्ये मानव्यशास्त्र, भाषा, ललीत कला विभाग, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी विभाग, शास्त्र विभाग, कृषी व पशुसंवर्धन विभाग, अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण विभाग, औषधनिर्माण शास्त्र विभाग अशा विविध क्षेत्रामधून तसेच सोलापूर विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी तसेच एम.फील. तसेच पीएच.डी. विभागातील संशोधक विद्यार्थी व मार्गदर्शक शोध संशोधन सादर करणार आहेत.
या संशोधन महोत्सवाचा समारोपाचा कार्यक्रम २४ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वा. होणार असून यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबईचे पद्मश्री डॉ. आर.व्ही.होसूर आहेत तर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या संशोधन महोत्सवातून विद्यार्थी, शिक्षक यांना प्रेरणा मिळणार असून यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी होणार आहे. या महोत्सवात एकूण ३७० संशोधक आपले शोध प्रकल्प सादर करणार आहेत. समन्वयक म्हणून डॉ. एम.जी. माळी, रजिस्ट्रार प्रा.डॉ. व्ही.बी.घुटे, ‘अविष्कार २०१८’च्या यशस्वी नियोजनासाठी संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन समिती स्थापन केली आहे. यामध्ये स्वेरीकडून समन्वयक म्हणून डॉ. ए.बी. शिंदे काम पहात आहेत. विविध प्राध्यापक वर्ग समिती सदस्य म्हणून काम पहात आहेत. हा संशोधन महोत्सव यशस्वी करण्यासाठी अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. सोलापूर विद्यापीठातर्फे स्वेरीत होणारा अविष्कारचा हा दुसरा महोत्सव असून यापूर्वी २०११ साली हा अविष्कार महोत्सवाचे यजमानपद स्वेरीला मिळाले होते. गेल्याच आठवड्यात स्वेरीमध्ये ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे पार पडली.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com