👁 7 Views

येणारा काळ हा रिसर्च गुरुचा असेल – कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस

पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018

श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात अविष्कार २०१८’ या  संशोधन महोत्सवाचे थाटात उदघाटन.
पंढरपूरः (संतोष हलकुडे)संशोधनात सातत्य राखणे हे यशस्वी जीवनाचे सार असले तरी आपल्यामुळे समाजाला का, काय, कधी, कोठे, कसे’ या पाच ‘क’ कारांची उत्तरे अपेक्षित असतात त्यासाठी प्रत्येकांनी संशोधन कार्य ध्येयाने केले पाहिजे. आज जरी ‘गुगल गुरु’ असला तरी, अशा संशोधनाच्या उपलब्ध व्यासपीठामुळे उद्याचा काळ निश्चितपणे ‘रिसर्च गुरु’ असणार आहे.’ असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
              
सोलापूर विद्यापीठाच्या वतीने येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या अविष्कार २०१८’ या संशोधन महोत्सवाच्या उदघाटन समारंभाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. फडणवीस बोलत होत्या. दिपप्रज्वलनाने व सोलापूर विद्यापीठाच्या प्रार्थना गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. समन्वयक डॉ. एस.डी.राऊत यांनी प्रास्ताविकात अविष्कार २०१८’ या संशोधन महोत्सवाची संपूर्ण माहिती दिली. सोलापूर विद्यापीठाचे शैक्षणिक, संशोधन व विकास मंडळाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा.डॉ. व्ही.बी.पाटील यांनी अविष्कार महोत्सवात सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांचे रुपांतर पेटेंटमध्ये कसे करता येईल याबाबत विद्यापीठाची भूमिका मांडली. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयातून स्वेरीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले व स्वेरीची संपूर्ण माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून ट्रान्सपॉवर प्रा. लिमी. चे उपाध्यक्ष डॉ.शिवाजी पडवळ यांनी ‘सद्सदविवेक बुद्धीने संशोधन केल्यास समाजासाठी उपयोगी संशोधन करू शकतो.’ असे सांगून एल.सी.डी.प्रोजेक्टरद्वारे विविध कपलिंगची माहिती देवून, संशोधन सादरीकरणाच्या अशा व्यासपीठामुळे संशोधनास उर्जा मिळते असे सांगितले. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, ‘जगामध्ये ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका’ या संशोधन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पाच देशापैकी भारताकडे संशोधन करण्याची क्षमता सर्वाधिक आहे. चीनने आपल्या ठिकाणी गोष्टी शिकून आणि त्यांच्या ठिकाणी जावून स्मार्ट बनले आहेत. त्यासाठी संशोधन करताना पाया मजबूत करून उभारणी करावी कारण संशोधन क्षेत्रात आपला नाविन्यपूर्ण शोध प्रकल्प पाहिला जातो तर आपली पदवी नाही. यासाठी संशोधकांनी प्रथम पाया भक्कम करावा.’ असे सांगून अविष्कार २०१८’ मध्ये सहभागी झालेले विविध महाविद्यालयातील प्राचार्य,उपप्राचार्यविद्यार्थी व संशोधक यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण दिवसात कॉलेज कॅम्पस संशोधक स्पर्धकांनी फुलला होता. अत्यंत शिस्तबध्द व उत्साहात उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातून जवळपास ३७० संशोधकांनी आपल्या संशोधन प्रकल्पांची नोंदणी केली. त्यांच्यासाठी स्वतंत्र सुसज्ज हॉलची व्यवस्था केली होती. यामुळे सर्व स्पर्धकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. 
यावेळी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ.एस.एन.शिंदे, व्यवस्थापन विभागाचे सदस्य डॉ. एन.बी.पवार, प्र.कुलसचिव प्रा.डॉ. व्ही.बी.घुटे सहसमन्वयक डॉ. एम.जी. माळी, श्रीमती जे. डी.माशाळे, डॉ. व्ही.पी.धुळप, डॉ. ए.डी.विभूते, व्ही.एम.मुच्छाले, जी.आर.आराध्ये, बी.एम.खुने उपस्थित होते. तसेच परीक्षक म्हणून डॉ. मनिश कस्तुरे, डॉ. एन.व्ही.सिंग, डॉ. डी.एम.खंदारे,डॉ. सुयोग अमृतराव, डॉ.लक्ष्मण नेटक, डॉ.प्रदीप भास्कर, डॉ. औंदुबर सरवदे, डॉ. पी.लोणारकर, डॉ. बी.एस. सुरवसे, डॉ. देऊ भांगे, डॉ. रुपाली गिरवे, डॉ.ए.एस.बिराजदार, डॉ.सुरेश रे हे लाभले आहेत. स्वेरीचे विश्वस्त बी.डी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, बी.फार्मसीच्या प्राचार्या डॉ. एस.डी सोनवणे, अभियांत्रिकीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, संशोधक व स्पर्धक विद्यार्थीकार्यक्रमाचे स्वेरीचे समन्वयक व संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.बी.शिंदे, प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. नीता कुलकर्णी यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा यांनी मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *