👁 7 Views

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रिपाईचे पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष पवार यांचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018


पंढरपूर – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सन्मानार्थ रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूर येथील शहीद कुणाल गोसावी आंधशाळा व पालवी शिक्षण संस्थांना प्रत्येकी दोन रुमहिटर ही भेट देण्यात आले आहेत. याशिवाय शाळांच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण समतोलाचा संदेश दिला आहे.


केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये आंबेडकरी चळवळीतून आपले आयुष्य घडविले त्यानंतर ही त्यांनी गरजू तरुण, कुटूंबाना शिक्षण व इतर कामासाठी कायम मदतीचा हात दिला आहे. त्यानुसार रिपाइंचे पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासत येथील कुणाल गोसावी अंध शाळा व पालवी शिक्षण संस्थेमधील अंध अपंग विध्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी प्रत्येकी दोन रुमहिटर भेट दिले आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांची हिवाळ्यात थंडीपासून मोठी सोय होणार आहे या शिवाय या विध्यार्थ्यांना अन्नदान शाळांच्या आवारात फळांची रोपे लावत वृक्षारोपण केले आहे.


यावेळी संतोष पवार यांच्या सह बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, कुमार भोसले,दिपक चंदनशिवे,भीमराव शिंदे, अर्जुन मागाडे, संतोष सर्वगोड, समाधान लोखंडे , विजय वाघमारे, कैलास कांबळे, विक्रम चंदनशिवे, उमेश सर्वगोड, सचिन भोसले, संघराज इंगळे, निलेश जाधव, विक्रम कांबळे, अमित कसबे, सचिन भडकवाड, रोहित ताठे, विक्रम पवार, कुमार ढवळे, लक्ष्मण कांबळे,पोपट क्षीरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *