👁 7 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये सावित्रीबाई फुले यांची १८८ वीजयंती साजरी

पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019

पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती निमित्त तुकाराम चिंचणीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
      

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडेव्याख्याते तुकाराम चिंचणीकरचारूशिला कुलकर्णीडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. अंजली पिसेप्रा. सुषमा कोडगिरी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
   यावेळी बोलताना तुकाराम चिंचणीकर म्हणालेएक काळ असा होता या देशातील स्त्रियांना सर्वोच्च मान होता. भारतीय शिक्षण पद्धती स्वातंत्र्यानंतर फारशी सुधारली नाही. आपल्या हिंदू धर्माविषयी अपप्रचार जास्त झाला आहे. स्त्रियांना पूर्वी शिक्षणाचा अधिकार होता,परंतु ब्रिटिशांनी स्त्रियांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. अशावेळी सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. स्त्री शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांनी रोवला आहे. सावित्रीबाई फुले यांचे मराठी इंग्रजी व संस्कृत या तीन भाषेवर प्रभुत्व होते. म्हणून आजच्या महिलांनी समाज जीवनात वावरत असताना कोणत्यातरी एका भाषेवर प्रभुत्व निर्माण करण्याची गरज आहे. महात्मा फुले यांचा संघर्ष हा समाजातील अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्यात यासाठी होता. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा याविषयी त्यांनी केलेले कार्य खूप महान आहे. आजची स्त्री शिकली आहे परंतु त्यांना फारसे स्वातंत्र्य नाही.

   सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी केलेले कार्य खूप महान आहे. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री अग्रेसर आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांविषयी असलेल्या रूढी परंपरा बंद करून स्त्रियांबद्दल समाजात आदर निर्माण केला. समाजात सुरू असलेल्या अनिष्ट प्रथाना पायबंद घालण्यास सावित्रीबाई फुले यांचा मोलाचा वाटा होता. आजच्या स्त्रीने सावित्रीबाई फुले यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. आपल्या प्रतिकूल परिस्थितीचा संघर्ष करत सावित्रीबाई फुलेंनी समाजातील स्त्रियांना शिक्षण दिले आहे. स्त्रियांनी शिक्षण घेऊन देशाविषयी माझे काही तरी देणे लागते याविषयी काम केले पाहिजे. आजची परिस्थिती खूप भयानक आहे प्रसारमाध्यमे आज समाजासाठी घातक ठरत आहेत. आजचा तरुण-तरुणी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वेगळ्या वाटेने जात आहेत. सोशल मिडियामुळे आज तरूण आपला वेळ वाया घालवत आहेत. महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने जीवन जगले पाहिजे. प्रत्येक स्त्रीयांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट अभ्यासला पाहिजे तरच त्यांचे जीवन सार्थक होईल आणि भावी पिढीवर योग्य संस्कार करण्याची गरज असल्याचे मत तुकाराम चिंचणीकर यांनी व्यक्त केले .
        हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *