पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019
दि. 6 जानेवारी 2018 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पंढरीतील पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी महाविद्यालयातील सभागृहात पत्रकारितेतील पावित्र्य या विषयावर जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांचे व्याख्यानही आयोजित केले होते. व्याख्यानात बोलताना श्री.बडवे यांनी पत्रकारितेतील नितीमुल्यांसंदर्भात मोलाची माहिती दिली.
पत्रकारांनी आपल्या व्यवसायात वैचारिक पावित्र्य जपणे आवश्यक
– मा. बाळासाहेब बडवे
पंढरपूर: “लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमे प्रामाणिकपणे काम करतात. वृत्तपत्र हे समाज घडविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. समाज घडविण्यात पत्रकार बांधव महत्त्वाची भूमिका बजावतात. लोकशाही अधिक बळकट करून पारदर्शक व लोकाभिमुख बनविण्यात पत्रकाराचे योगदान मोलाचे आहे.
पत्रकारांनी आपल्या व्यवसायात वैचारिक पावित्र्य जपणे आवश्यक आहे. ”असे
प्रतिपादन पंढरी संचारचे संपादक मा. बाळासाहेब बडवे यांनी केले.
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनी व प्रसिद्धी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार समारंभ आणि ‘पत्रकारितेतील पावित्र्य’या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते
पुढे म्हणाले की, ‘बहुजनांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्याचे बहुमोल काम कर्मवीरांनी केले. त्यामुळे सुशिक्षित तरुण स्वाभिमानाने जीवन जगू लागला आहे. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे होते.
अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले ‘पत्रकारिता ही व्यवसाय नसून ती एक सेवा आहे. कर्मवीर अण्णांनी बहुजनांच्या विकासाचे काम शिक्षणाच्या माध्यमातून केले. तेच काम आजचे पत्रकार आपल्या लेखणीचा माध्यमातून करीत आहेत’ ६ जानेवारी हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्या निमित्तानेपंढरपूर शहर व परिसरातील पत्रकार बंधूंचा सत्कार प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे, श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष शिवाजी शिंदे,पंढरपूर श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष सचिन कसबे, पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे पंढरपूर पत्रकार संघ अध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष रामभाऊ सरवदे, पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष वीरेंद्र उत्पात, , उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, उपप्राचार्य एन. एन. तंटक, डॉ. विकास कदम, प्राध्यापक प्रबोधिनी चेअरमन डॉ. शरद इंगवले, श्री. शिवाजी लोभे, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. सुभाष कदम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. शरद इंगवले यांनी करून दिला. शिक्षक- शिक्षेकेतर सेवक बहुसंखेने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. सारिका भांगे यांनी केले. आभार प्रा. सुभाष कदम यांनी मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







