👁 8 Views

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक

पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2019           

                               

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला उत्तर आफ्रिकेतील सेनेगेल येथे अटक केल्याचे वृत्त आहे. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे भारतीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. २२ जानेवारीला त्याला अटक केल्यानंतर २६ जानेवारी या दिवशी भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली. अटकेनंतर पुजारी याला भारतात आणले जाईल असे समजते.
गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो ऑस्ट्रेलियात राहात असावा असा पोलिसांचा अंदाज होता.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी दीपक तलवार यांच्या प्रत्यर्पणाद्वारे भारतात आपण्यात भारताच्या प्रयत्नांना यश काल आल्यानंतर रवी पुजारीवरील कारवाईचे वृत्त हाती आले आहे. दोघांनाही बुधवारी भारतात आणल्याबरोबर ईडीने आपल्या ताब्यात घेतले. कोर्टाने गुरुवारी राजीव सक्सेनाला ४ दिवसांची कोठडी, तर दीपक तलवारला ७ दिवसांची कोठडी ठोठावली आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणा सतत रवी पुजारीवर लक्ष ठेवून होत्या. तो सेनेगलमध्ये असल्याचे समजण्यापूर्वी तो पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये असल्याचे समजले. तेव्हापासून यंत्रणा त्याच्या मागावर होत्या.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *