👁 10 Views

श्रीनगरी शासकीय कर्मचारी वसाहतीमध्ये टाकळी ग्रामपंचायतमार्फत पथदिवे

पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2019    

 
 खर्डी अमोल कुलकर्णी
पंढरपूर तालुक्यातील ल.टाकळी हद्दीतील श्रीनगरी येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.यासाठी सरपंच सौ नूतन रसाळे यांना निमंत्रित केले होते. या वसाहतीत 144 शासकीय कुटुंबे आहेत.येथील महिला व रहिवाशांनी समस्या महिला सरपंच यांच्यासमोर मांडल्या. अनेक दिवसापासून रोड लाईट नसल्याने श्रीनगरी वसाहत अंधारात होती. मागणी नुसार नवीन दिवे बसवण्यात आले होते .ग्रामपंचायत टाकळी व म.रा.वि.मंडळ पंढरपूर यांच्या सहकार्याने श्रीनगरी वसाहतीत लाईट सेवा सरपंच सौ नूतन रसाळे यांच्या हस्ते सुरू झाली.     
तसेच शासकीय वसाहतीतील महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम मा.सरपंच सौ.नूतन रसाळे  अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीगरी शासकीय वसाहतीचे संघर्ष समिती चे अध्यक्ष मा.अर्जुन मागाडे यांनी केले. सदर प्रास्ताविकात मा.मागाडे यांनी वसाहतील सर्व गृहनिर्माण संस्था स्तरावरील समस्या मांडल्या.

यावेळी पंचायत समितीचे सभापती मा.राजेंद्र(बप्पा)पाटील व उपसभापती मा.अरुण घोलप हे उपस्थित होते.वसंत बेसुळके ,रामचंद्र गायकवाड ,भिमराव जगताप,आनंदा सोनवणे आणि शासकीय वसाहतीतील सर्व  महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मा.सभापती साहेबांनी पिण्याच्या पाण्याची सोय व अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व ईतर सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.प्रमुख पाहुणे मा.सौ.रसाळे ताई सरपंच यांनीही सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप हरकारे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामचंद्र गायकवाड यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष समिती चे सचिव मा.गंगाधर कोळी सर व नीलेश जगताप,सुजीत अभंगराव,नीलेश कोळी,दिनेश आढवळकर,मोनू रोपळकर यांनी परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *