पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2019
भाळवणी तालुका पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत समाज कार्यकारणीच्या अध्यक्षपदी शशिकांत विभुते उपाध्यक्षपदी विश्वजित देशमुख सचिवपदी सचिन जमदाडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उत्कर्ष शेठे, महादेव पाटील, डॉ. नष्टे, उमेश गुळवे, सुधाकर भिंगे आदी.
“विचारातून अनुमान मिळणार आहे..संपर्क असला की संवाद, संवाद झाला की संघटन होणार अाहे. भाळवणीची वज्रमुठ हीच दिशा देणारी आहे. हेवेदावे , मत्सर ठेवू नका. सध्या भावभावकीतील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा. एकजुटीसाठी सोलापूर जिल्ह्यात भाळवणी अग्रेसर राहणार.” असे मत विरशैव लिंगायत समाज जिल्हाअध्यक्ष उत्कर्ष शेठे
यांनी व्यक्त केले.
भाळवणी तालुका पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजिलेल्या बैठकीत श्री शेठे बोलत होते. प्रस्ताविक नितीन ढोले व महेश जमदाडे यांनी केले.याप्रसंगी वीरशैव लिंगायत समाज युवा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शशिकांत अरुण विभुते, उपाध्यक्ष विश्वजीत विद्यासागर देशमुख तर सचिव पदी सचिन जमदाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
विचार, कृती हेच सेवटपर्यत टिकणार आहे. यासाठी समाजकार्यात उतरा असे सांगून महीलांना सन्मान द्यावा असे आवाहनही शेठे यांनी केले.
कार्यक्रमासाठी माळशिरस तालुका अध्यक्ष महादेव पाटील, डॉ. नष्टे, सुधाकर भिंगे, उमेश गुळवे, व वीरशैव लिंगायत समाज आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण जमदाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गजेंद्र देशमुख यांनी मानले.
—
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







