👁 8 Views

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजकांकडून सोफोशला मदत निधी सुपूर्त… समाजकार्यासाठी मदत करता आल्याचा आनंद- सुंदर अय्यर

पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2019

       
 पुणे, 4 फेब्रुवारी 2019: टाटा ओपन महाराष्ट्रच्या स्पर्धेच्या संयोजकांकडून आज सोफोश(सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल) या पुण्यातील प्रख्यात स्वयंसेवी संस्थेला मदत निधीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. हि संस्था श्री वत्स या बालकांसाठीच्या केंद्रात अनाथ मुलांसाठी पुनर्वसन आणि विकासाचे कार्य करत असते. यावेळी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि सोफोशच्या उपाध्यक्षा डॉ.कविता करीर उपस्थित होत्या.

या स्पर्धेमध्ये करण्यात येणाऱ्या प्रत्येक बिनतोड सर्व्हिसमागे(एस) सोफोशला आर्थिक मदत देण्याची स्पर्धेच्या संयोजकांनी केली होती. त्यानुसार सुंदर अय्यर व प्रशांत सुतार यांच्या हस्ते डॉ.कविता करीर यांनी स्वीकारला.
यानिमित्ताने समाजकार्यासाठी काही मदत करता आली याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया सुंदर अय्यर यांनी व्यक्त केली.  स्पर्धेपूर्वी प्रशांत सुतार यांच्याशी चर्चा करीत असताना हि कल्पना सुचल्याचे सांगून सुंदर अय्यर म्हणाले कि, यापुढेही प्रत्येक स्पर्धेमागे अशाच प्रकारे विविध सामाजिक संस्थांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, अन्य स्पर्धांच्या संयोजकांनाही आम्ही हि कल्पना सुचवणार आहोत. यावेळच्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत 300हुन अधिक विक्रमी बिनतोड सर्व्हिसमागे(एस)करण्यात आल्या. त्यामुळे सोफोशला आम्हांला भरीव मदत करता आली, हा सुद्धा चांगला योगायोग म्हणावा लागेल.

यावेळी बोलताना प्रशांत सुतार म्हणाले कि, समाजाशी असलेले नाते दृढ करण्याचा आमचा प्रयत्न असून विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून संयोजकांनी अशाच प्रकारे मदत करणे आवश्यक आहे. सोफोशच्या उपाध्यक्षा डॉ. कविता करीर यांनी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजकांचे याबद्दल मनापासून आभार मानले. एस फॉर सोफोश ही कल्पना अभिनव असल्याचे सांगून करीर म्हणाल्या कि, मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत उपयुक्त असा निधी आम्हांला उपलब्ध झाला आहे. 

अन्य स्पर्धांच्या संयोजकांनी असा उपक्रम राबविल्यास सोफोशसारख्या संस्थाना बहुमोल मदत मिळू शकेल. तारा सोफोश ढफळे सेंटर हे पिंपळे गुरव येथे स्थापित असून विशेष मुलांसाठी कार्य करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. सोफोश ही संस्था ससून रुग्णालयातील रुग्णांना  औषधउपचार, समुपदेशन, गरज लागल्यास आर्थिक हातभार आणि पायाभूत सुविधांसाठीही विशेष करून साहाय्य करीत असते. यासाठी सोफोशच्या रुग्णकल्याण विभागातून मदत देण्यात येते. दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या “तारा” या संस्थेसमोरील आव्हाने मोठी असून त्या गरजा भागविण्यासाठी आम्हाला अधिक मदतीची  गरज आहे. तसेच, दोन्ही संस्थांचे आर्थिक कारभार पारदर्शक असल्यामुळे देणगीदारांना आपल्या मदतीचा योग्य विनियोग झाल्याची खात्री बाळगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *