पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2019
सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी ता.पाटण येथील महाविद्यालयीन युवती कु.भाग्यश्री संतोष माने (वय 17) हीची गळा चिरुन हत्या करण्यात आली असून या हत्येच्या घटनेतील आरोपीस अटक करण्यास अजुनही पोलीसांना यश आले नाही.या घटनेमुळे नाभिक समाजात प्रचंड संतापाचे वातावरण असून या घटनेचा तपास सीआयडी मार्फत करुन सदर खटला जलदगती कोर्टात चालविला जावून आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणंी नाभिक समाजातून होत आहे.या बाबत पंढरपूर शहर नाभिक युवक संघटनेच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले असून या बाबत कार्यवाही न झाल्यास 11 फेबु्रवारी रोजी नाभिक समाज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहीती नाभिक युवक संघटनेचे अध्यक्ष महेश माने यांनी दिली आहे.
हे निवेदन देताना प.महाराष्ट्र अध्यक्ष सतिश चव्हाण,बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष किशोर भोसले,पंढरपूर सलून दुकान मालक संघटनेचे चेअरमन पांडुरंग यादव,प्रमोद लाडगावकर,व्हा.चे.तुकाराम चव्हाण,विजय माने,महेश माने,गणेश माने,पांडुरंग डांगे,अनिल वाघमारे,दिपक जाधव,प्रीतम भोसले,सुनिल खंडागळे,परमेश्वर डांगे,नागराज हडपद,युवराज हडपद,सोमनाथ खंडागळे,नागनाथ माने आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






