पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2019
शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची माहिती
चंद्रभागा मैदान येथे आता परिवहन विभागाच्या वतीने 21 कोटी 84 लाख रुपये खर्चुन भव्य बसस्थानक व भक्त निवास उभारले जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
पंढरीतील चंद्रभागा मैदानाच्या विस्तीर्ण मैदानाचा उपयोग यात्रा कालावधीत तात्पुरते बसस्थानक म्हणून होत आला आहे. इतर वेळी हे मैदान वापराअभावी पडून असते.यात्रा कालावधीत या ठिकाणी तात्पुरते बसस्थानक उभारण्यासाठी राज्य परिवहन महांंडळाकडून लाखो रुपये खर्च केले जात होते. प्रतिवर्षी खर्च करण्यात येणारी रक्कम पाहता या ठिकाणी स्थायी स्वरुपात बसस्थानकाची इमारत बांधली जावी. अशी मागणी शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केली होती.
मागणीची दखल घेत दिवाकर रावते यांनी या कामास मंंजूरी दिली होती. या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे.राज्यातील जवळपास सर्वच बसस्थानकातून तिर्थक्षेत्र पंढरपूरसाठी नियमित एस.टी.बस सोडली जात असल्याने या गाडया घेवून येणार्या चालक वाहकांसाठी येथील जुन्या बसस्थानकाच्या आवारातील कर्मचारी विश्रांतीगृह अपुरे पडत होते. तसेच ही इमारत जुनी झाल्यामुळे तसेच येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्याच बरोबर यात्रा कालावधीत नियंत्रणासाठी आलेल्या परिवहन विभागाच्या वरिष्ठ आधिकार्यांनाही येथील खाजगी लॉजचा आश्रय घ्यावा लागत होता.परिवहन मंत्री दिवाकर रावते हे पंढरपूर दौर्यावर आल्यानंतर शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी या समस्येबाबत ना.रावते यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत चंद्रभागा मैदान येथे आता परिवहन विभागाच्या वतीने 21 कोटी 84 लाख रुपये खर्चुन भव्य बसस्थानक व भक्त निवास उभारले जाणार आहे.पंढरपूर शहरातील नविन बसस्थानकातील कॉक्रिटीकरणा साठीही ना.दिवाकर रावते यांनी निधी उपलब्ध करुन दिला असून हे काम लवकरच पुर्ण होणार असल्याची माहीती संभाजी शिंदे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली.त्याच बरोबर शहरातील नविन बसस्थानकाच्या परिसरात पश्चिमेकडील रेल्वे रुळाच्या बाजूस मिनी गाळे बांधून ते बेरोजगार युवकांना देण्यासाठी आपण ना.दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा करीत असल्याची माहीती संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
पंढरपूर शहरातील नविन बसस्थानक हे खाजगी भागीदारीतून राज्य परिवहन महामंडळाने बांधण्यात आले आहे.नाशिकच्या साईरचना या बांधकाम व्यवसायीक फर्म कडून या ठिकाणी बांधण्यात आलेल्या दुकान गाळ्यांच्या विक्रीवेळी निर्धारीत करण्यात आलेली अफसेट प्राईज ही या शहरातील सर्वसामान्य छोटया व्यवसायीकांच्या द्रष्टीने आवाक्याबाहेर होती.या बसस्थानकाची जागा ही राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीची असून सद्या या स्थानकाच्या आवारात पश्चिम बाजूकडे मिनी गाळे बांधण्यात यावेत आणि सदर गाळे छोटया व्यवसायीकांना उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी सातत्याने होत आली आहे.चंद्रभागा बसस्थानकाच्या जागेत नविन बसस्थानक उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे आता गाळे बांधण्याबाबतही लवकरच निर्णय होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com