👁 7 Views

पंढरपूर-मोहोळ मार्ग अपघात समयी त्यांनी जपली माणुसकी… अपघातातील जखमी धनश्री देतेय मृत्यूशी कडवी झुंज

पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2019

                        
दि. 2 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- मोहोळ मार्गावर घाडगे वस्ती, देगाव येथे इको कार आणि एस.टी. बस समोरासमोर धडकून भीषण अपघात घडला. या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या धनश्री सुरेश सावंत या मुलीला अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून तिला तात्काळ पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल व त्यानंतर सोलापूर येथील बलदेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करणारे व अद्याप स्वत: या हॉस्पिटलमध्ये थांबून उपचार घेत असलेली धनश्री शुध्दीवर येण्याची वाट बघणारे सोलापूर येथील अतुल पाटील यांनी  एका अनोख्या माणुसकीचं दर्शन दिलं आहे. या भीषण अपघातात धनश्री वगळता दोन कुटूंबातील सर्वांचा मृत्यु झाला. धनश्रीवर उपचार सुरु असून सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये मृत्युशी कडवी झुंज देत आहे.
 2 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या भीषण अपघातात या 6 जणांचा मृत्यु झाला. हा अपघात झाला तेंव्हा पंढरपूर लाईव्हला समजलेल्या माहितीनुसार सोलापुर येथे राहणारे अतुल पाटील हे गृहस्थ बसमधुन प्रवास करीत होते. यावेळी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेली धनश्री मात्र जगु शकते हे पाहून अतुल पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता धनश्रीला अपघातग्रस्त गाडीच्या बाहेर काढुन पंढरपूर कॉटेज हॉस्पिटल येथे आणले. तेथुन पुढील उपचारासाठी सोलापुर हलवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्या नंतर त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली व ते स्वतः या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसून धनश्रीला सोलापुरमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. धनश्रीच्या नातेवाईकांचा नंबर मिळवुन मोबाईल वरून अतुल पाटील यांनी संपर्क केला असता त्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये घेवुन जाण्याची विनंती केली. 

पाटील यांनी धनश्रीला बलदेवा हॉस्पिटलमध्ये भरती केलं. या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून धनश्रीची मृत्यूशी झुंज चालु आहे. व अतुल पाटील स्वतः या हॉस्पिटल मध्ये थांबुन आहेत. पंढरपूर लाईव्हने अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधळा असता, ‘अद्यापही धनश्रीची मृत्युशी झुंज चालु असुन ती उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.  हे सांगताना अतुल यांचा कंठ दाटून आलेला जाणवला. ना नात्याचे ना गोत्याचे परंतु अतुल पाटील यांनी जपलेल्या या माणुसकीच्या या अनोख्या नात्याला पंढरपूर लाईव्हचा सलाम. पाटील यांच्या व उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळावे आणि लवकरात लवकर धनश्री शुध्दीत यावी. हीच सदिच्छा.             


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *