👁 8 Views

वाखरी येथील काजल पोरे च्या दुर्दैवी आत्महत्येचा आज 13 वा दिवस…. शिवसेनेच्या आरती बसवंती यांनी केले पोरे कुटूंबियांचे सांत्वन

पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2019

           

वाखरी येथील आश्रमशाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या काजल दत्तात्रय पोरे (वय16) या विद्यार्थिनीने दि. 23 जानेवारी 2019 रोजी रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. ही दुर्दैवी घडली त्याचा आज 13  वा दिवस. काजलच्या कुटूंबियांनी आपल्या राहत्या घरी काजलच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दाटलेल्या कंठांनी व साश्रुपुर्ण नयनांनी काजलच्या आठवणी जागृत केल्या.
यावेळी शिवसेनेचे सौ.आरती बसवंती व ओंकार बसवंती यांनी काजलच्या घरी जावुन पोरे कुटूंबियांचे सांत्वन केले व काजलला श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत सौ.उषा शिंदे व सौ.सुनीता आवताडे या उपस्थित होत्या. 
काजलच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत. काजल हिला कोणीतरी अनोळखी मुलाने फोन नंबरची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करुन तिची बदनामी व्हावी म्हणून छेड काढुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्ययाची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती.
                  


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *