👁 8 Views

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी मध्ये एक दिवशीय कार्यशाळा

पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019

  

पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

      सिंहगड महाविद्यालयातील संगणक विभाग आणि आय.ई. आय.सोलापूर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानााने २ फेब्रुवारी रोजी “ॲग्युलर ६+गुगल फायरबेस” या विषयावर एकदिवसीय व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन संगणक विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे, प्रमुख पाहुणे आय.ई.आय. सोलापूर लोकल सेंटर चे आ. सेक्रेटरी प्रा. पी. के. मगदूम,  सोलापूर लोकल सेंटर च्या संगणक अभियांत्रिकी विभागाचे मेंबर ऑफ बोर्ड प्रा. सोमनाथ ठिगळे व संतोष देशमुख, सक्सेस व्हिजन साॅफ्टेक आदी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.              
यावेळी प्रमुख पाहुणे यांचे संगणक विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या व्याख्यानासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. रविंद्र टाकळीकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातीलसर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *