पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019
सोलापूर ग्रामीण जिल्हा कॉंग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी मधुकर ज्ञानेश्वर फलटणकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र ओबीसी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी मोरे, कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रकाश सातपुते व ओबीसी कॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी प्रमोद देशमाने यांच्याहस्ते देण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव प्रा.अशोक डोळ, ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब वाघमोडे -पाटील, राजू देवकर, विजू मेटकरी, धनु देशमाने, धनंजय जोजारे, सोलापूर जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष मिलिंद अढवळकर, नितीन पतंगे आदि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नुतन शहराध्यक्ष मधुकर फलटणकर म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाचे विचार, ध्येय धोरणे, शिस्त सहकार्य व स्वावलंबन या प्रेरणेतून सर्वधर्म, समभाव, समता व बंधूता यातून राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी कार्य करणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमारजी शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण , आमदार भारतनाना भालके, तालुकाध्यक्ष प्रकाश तात्या पाटील, चेअरमन कल्याणराव काळे, प्रदेश महिला उपाध्यक्ष सुनेत्राताई पवार , ओबीसी कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष ऍड.अमित कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुयोग्य काम करून कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्वल करण्यासाठी व गोरगरीबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






