पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2019
रस्ते अपघात एक भयाण वास्तव असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.रस्ते अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.आज आम्ही रस्त्यावरुन फिरतो.लोकांची खुप गर्दी असते.ती गर्दी पाहता त्या गर्दीतून वाट काढणे खुप कठीण होते.तरीही आम्ही आमचा जीव धोक्यात घालून नव्हे तर जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडत असतो.पण कधीकधी नेमका तोल जातोच व रस्ते अपघात घडतो.
अलिकडे नवशिखे तरुण तरुणी रस्त्यावर गाड्या फिरवीत असतात.त्यात श्रीमंत बापाची माजलेली पोरंही असतात.त्यांना अपघाताचं काही घेणं देणं नसतं.जर अपघात घडलाच.तर पोलिसस्टेशनमध्ये पोलिसांना मँनेज करुन शिताफीनं ही मंडळी आपली सुटका करुन घेतात वा पाल्यांची सुटका करुन टाकतात.पण त्यात सामान्यांचा बळी जातो त्याचं काय?
ती नुकतीच वयात आलेली तरुण मंडळी गाड्या अशा वयात शिकतात की ज्या वयात त्यांनी गाडी चालवायलाच नको.त्यांचे सीटवरुन जमीनीवर पाय पुरत नाहीत.तसेच त्यांचा मेंदूही गाडी चालविण्यालायक सक्षम झालेला नसतो.तसेच त्यावेळी त्यांचा स्वभाव उतावीळ असतो नव्हे तर त्यांना गाडी कशी चालवायची?याचं तंत्रही माहीत नसतं.तसेच त्या गोष्टीची समजही आलेली नसते.पण घरी गाडी असल्यामुळे ते चालवत असतात.ते भरधाव गाडी चालवतात.मग अशावेळी समोरुन कोणी आल्यास ते करकचून ब्रेक दाबतात.त्यातच त्या गाडीचा तोल जावून ती गाडी खाली पडते व फरफटत पुढे जाते.त्यातच तो तरुणही फरफटत जातो.त्याला पायाला तसेच शरीराला भयंकर जखमा होतात.त्यातून भळाभळा रक्त जातं.मग तो बेशुद्ध होतो.तो होशात येत नाही व तो अखेरचा श्वास घेतो नव्हे तर कधी अचानक कोणी समोर आल्याने आमची धांदल उडते.त्यातच पाय जमीनीला न टेकल्याने आम्ही खाली डोक्याच्या भागावर पडतो व मेंदूला मार लागताच कोमात जावून प्राण सोडतो.काही काही मंडळी तर नशेत गाडी चालवतात.त्यातच ती नशा एवढी तीव्र असते की समोरचा माणूस आम्हाला ओळखुच येत नाही व अपघात घडतात.काही अपघात तर अनिद्रेमुळेही घडतात.
साधारणतः अपघात हे पंधरा ते तीस वयात जास्त घडतात.वर्षातुन हा आकडा वाढत आहे.अपघाताने मृत्यूदरही वाढला आहे.पुर्वी एवढे अपघात होत नव्हते.तेव्हा रस्तेही लहान होते तरीही……कारण तेव्हा गाड्यांचे प्रमाण जास्त नव्हते.तसेच तरुणाई कमी प्रमाणात गाड्या चालवत होती.मरणाचंही भय होतच.शिवाय वयस्क समजदार माणूस गाडी चालवत असल्याने तो समजदारीने व जबाबदारीने, काळजीपुर्वक गाडी चालवत होता.अपघात ट्रक चालविणारेच करायचे.कारण ते रात्री गाड्या चालवत.रात्री ती मंडळी गाडी चालवीत असतांना झोप येवू नये म्हणून अफूची नशा करीत.अफूची नशा एवढी पावरफुल असायची की त्या नशेत आपली गाडी कशी धावत आहे याचं तारतम्य नसायचं.त्यातच कधी रात्रीला एखादेवेळी झोप आलीच तर रस्ता अपघात घडत असे.बहुतःश रात्रीच या जड वाहनाच्या गाड्या चालत असत.मग त्या गाड्या कधी खाईत पडत तर कधी रस्त्याच्या खाली उतरुन पलटी होत असत.
लोकसंख्या आज अफाट वाढलेली आहे.आज मरणाची भीती कोणाला उरलेली नाही.लोकं भरधाव वेगानं गाडी चालवतात.मग वेळेवर वेगावर नियंत्रण न करता आल्यानं अपघात घडतात.खास करुन मुली तर गाड्या चालविताना वेग मर्यादा पाळत नाहीत.त्या तरुण मुलांनाच नाही तर आबालवृद्धांना अशी कट मारतात की ज्याला गाडीची कट मारली जाते.तो माणुस कितीही निष्णात गाडी चालविणारा असला तरी तो खाली पडतो.त्याच ठिकाणी एखादा तरुण जर असेल तर यात मुलींना दोषी धरलं जात नाही.मुलांनाच दोषी धरलं जातं.
रस्ता सुरक्षा ही आज काळाची गरज झालेली आहे.रस्ते मोठे आणि विकसीत झालेले असले तरी आमची गाडी चालविण्याची त-हा बदललेली नाही.ती आम्ही बदलंवायला तयार नाही.त्यामुळे अपघात घडत आहेत.वाढतही आहेत.आम्हाला मात्र त्याबद्दल काहीच दुःख वाटत नाही.
विशेष सांगायचं झाल्यास रस्ते अपघात घडू नये म्हणून जनजागृती व्हायला हवी.काही नियम सक्तीचे करायला हवे.हेल्मेट सक्तीही व्हायला हवी.तसंच परवाना देतांना त्याची किमान मर्यादा एकवीस वर्ष करायला हवी नव्हे तर त्या खालील मुले जर गाड्या चालवीत असतील तर त्यांच्या वडीलांना दंडच नाही तर शिक्षा व्हायला हव्या.तसेच अपघात प्रकरणं पोलिस स्टेशनला मँनेज होवू नयेत.वेगावरही नियंत्रण करायला हवं.खासकरुन मुलींनाही कडक नियम असावेत.सिग्नल तोडून कोणी जावू नये त्यासाठी जागोजागी दक्षता पथक नेमावे.तसेच कडक कारवाही व्हावी.
महत्वाचं म्हणजे पोलिस कुठंपर्यंत आपल्यावर लक्ष देणार!रस्ता सुरक्षा सांभाळणं हे आपलेच काम आहे नव्हे तर ती आपली गरज आहे.सामाजीक जबाबदारीही……ह्या जबाबदारीची जाणीव आपल्यालाच असावी.आपणच आपली ती जबाबदारी समजून गाड्या चालवाव्यात.जसे गाड्या चालविण्याचे प्रशिक्षण वर्ग असतात,तसे गाड्या रस्त्यावर कशा चालवाव्यात यासाठीही जनजागृती वर्ग असावेत.शाळेशाळेमधुन अगदी पहिल्या वर्गापासूनच रस्ता सुरक्षा सांभाळण्याचे विषय शिकवले जावे.जेणेकरुन आपला अपघात घडणार नाही आणि आपण सुरक्षीत घरी पोहोचू शकू हे लहानपणापासूनच आपल्याला कळेल.कारण कोणाची तरी बहिण,कोणाची आई,कोणाची पत्नी तर कोणाची मुलगी घरी वाट पाहात असते.हे लक्षात ठेवूनच तुम्ही गाड्या चालवायला हव्यात.जसे तुम्ही कोणाचे भाऊबहिण,पुत्र,पती,पत्नी,माता पिता आहात.तसेच अपघातात मरणारेही कोणाचे तरी पिता,पुत्र,भाऊ,बहिण,पती,पत्नी असतात.हे देखील लक्षात ठेवण्याची आजतरी गरज आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com